शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

तगड्या उमेदवारांसाठी रस्सीखेच अपक्ष व विद्यमान नगरसेवकांसाठी गळ

By admin | Updated: January 30, 2017 21:29 IST

युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - युतीचा घटस्फोट आणि आघाडीत बिघाडी आल्यामुळे महापालिका २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा असे सर्व मोठे राजकीय पक्ष स्वबळावरच मैदानात उतरणार आहेत. मात्र गेली २५ वर्षे युतीच्या बळावर निवडून येणाऱ्या शिवसेना-भाजपाची आता गोची झाली आहे. त्यामुळे अडचणीच्या अशा प्रभागांमध्ये विजयाच्या खात्रीसाठी तेथील विद्यमान नगरसेवकाला फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी अपक्ष मात्र तगड्या उमेदवारांना गळ टाकला जात आहे.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल 12 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसताना केवळ प्रभागातील जनसंपर्काच्या जोरवार या उमेदवारांनी बाजी मारली होती. या अपक्षांच्या पाठिंब्यावरच शिवसेना-भाजपा युतीने सत्तेसाठी ११४ चा मॅजिक आकडा गाठला होता. ७५ नगरसेवक निवडून आल्यामुळे शिवसेनेला या अपक्षांची महापौर निवडणुकीत लाभदायक ठरली. यामुळेच मित्रपक्ष भाजपाची खेळी सुरु असताना शिवसेनेचे पारडे जड राहिले.उभय पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने खात्रीच्या जागा सोडल्यास अन्य प्रभागांचा अंदाज दोन्ही पक्षांना नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेवेळी असे अपक्ष निवडून आलेले नगरसेवक हात मजबूत करतील. म्हणून आतापासून दोन्ही पक्षातून अपक्ष व खात्रीच्या उमेदवारांसाठी गळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. विजयाची खात्री असलेले प्रभाग सोडल्यास अडचणीच्या प्रभागांमध्ये कोणाचे पारडे जड आहे. प्रतिस्पर्धी पक्षच मजबूत असल्यास त्यांच्यापुढे कोण तगडे आव्हान उभे करेल, याचा अभ्यास सुरु असल्याचा अभ्यासही करण्यात आला आहे. प्रतिनिधी चौकट2012 मध्ये स्वबळावर निवडून आलेल्या 12 पैकी चार विद्यामान नगरसेवक यावेळेसही स्वबळावरच नशीब आजमावणार आहेत. उर्वरीतपैकी तीन भाजपा, दोन शिवसेनेत आणि एकाने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अपक्ष उमेदवारावर आरोप करण्यासाठी ब-याच वेळा संधी नसते. याउलट कोणत्या पक्षाशी संबंध नाही, हीच त्यांची जमेची बाजू असते. प्रभागात त्यांचा जनसंपर्क तगडा असतो. त्यामुळे मतदारही अशा उमेदवाराला प्राधान्य देतात. कुलाबामधून मकरंद नार्वेकर, अंधेरी पश्चिममधून विष्णू गायकवाड, मालाड पश्चिम येथून िसरील िडसोजा अपक्ष लढणार आहेत. यावेळेस सर्वच मोठे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने उमेदवारांची संख्याही अधिक असणार आहे. नागरिकांचा उमेदवार ही संकल्पना गेल्या निवडणुकांतून पुढे आली. यास मतदारांनीही चांगलाच प्रतिसाद दिल्याने. यावेळेसही नागरिकांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 2007 च्या निवडणुकीत नागरिकांचा उमेदवार म्हणून निवडून येणारे अडॉल्फ डिसोजा हे पहिले नगरसेवक होते.चेंबूर, गोवंडी, विलेपार्ले आणि जुहू येथून स्थानिक नागरिक आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत.