शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Central Railway: मध्य रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम; १.५० लाख प्रकरणांमधून ९.५ कोटी वसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 21:59 IST

Central Railway: मध्य रेल्वेने बोनाफाइड रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात तसेच विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरूद्ध नियमित मोहीम राबविली.

 डोंबिवली :मध्य रेल्वेने बोनाफाइड रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात तसेच विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरूद्ध नियमित मोहीम राबविली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कोविड प्रोटोकॉलनुसार केवळ अनुमती असलेले प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतील हे सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्यामुंबई विभागाने उपनगरी आणि गैरउपनगरी/ मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सखोल आणि नियमित तिकीट तपासणी मोहीम  चालविली.

मे -२०२१ च्या महिन्यात विनातिकीट/अनियमित प्रवाशांची ५४,००० प्रकरणे आढळून आली आणि त्यांतून रू. ३.३३ कोटी दंड म्हणून वसूल करण्यात आले.  यामध्ये  उपनगरी भागातील ३२,००० प्रकरणांचा समावेश असून त्यात रु. १.६५ कोटी रुपये आणि गैर-उपनगरी विभागात २२,००० प्रकरणांचा समावेश असून त्यातून १.६८  कोटी रुपये वसूल करण्यात आले. दि. १.४.२०२१ ते ३१.५.२०२१ या कालावधीत, विनातिकीट/अनियमित प्रवाशांची एकूण १.५० लाख प्रकरणे आढळून आली ज्यामध्ये गैरउपनगरी गाड्या (लांब पल्ल्याच्या गाड्या) आणि उपनगरी गाड्यांमधून दंड म्हणून रु. ९.५० कोटी वसूल करण्यात आले.  

या व्यतिरिक्त तिकिट तपासणी कर्मचा-यांच्या विशेष पथकाने दि. १७.४.२०२१ ते २.६.२०२१ या कालावधीत मुखपट्टी न घातलेल्या व्यक्तींची १२६९  प्रकरणांमधून  रू.  २,४०,६४५  इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या अनधिकृत प्रवासाची २०१८ प्रकरणेही आढळून आले आणि दि. ०१.४.२०२१ ते ३१.५.२०२१ या कालावधीत रू. १०,०९,०००/-  इतकी रक्कम दंड म्हणून वसूलण्यात आली. 

मध्य रेल्वेने प्रवाशांना असुविधा  टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबई