शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

ठाण्यात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

By admin | Updated: February 23, 2015 02:56 IST

‘छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी होते का?’ या विषयावर मुस्लिम यूथ फेडरेशनतर्फे ठाण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता

ठाणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी होते का?’ या विषयावर मुस्लिम यूथ फेडरेशनतर्फे ठाण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या परिसंवादाला परवानगी नाकारली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात शनिवारी मोर्चा काढला होता. जमावबंदीचा आदेश मोडून मोर्चा काढणाऱ्या माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाडांसह १५० कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू-मुस्लिम भेदभाव केला नाही. तरीही, ते मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार केला जातो. यावर चर्चा होण्यासाठी ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी या परिसंवादाचे आयोजन केले होते. त्याला बजरंग दलाचे सुनेश जोशी, विक्रम भोईर यांच्यासह काही संघटनांनी विरोध दर्शविला होता. जे वक्ते या परिसंवादात आहेत, त्यामध्ये आणखी दोन हिंदुत्ववादी संघटनांच्या वक्त्यांचा समावेश करावा. तो कार्यक्रम गडकरी रंगायतनमध्ये घेण्यात येऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केली होती. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर शुक्रवारी रात्री नौपाडा पोलिसांनी या परिसंवादाला परवानगी नाकारली. या निषेधार्थ पाचपाखाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ते गडकरी रंगायतनदरम्यान सायंकाळी ६.३० ते ७.३० वा. दरम्यान निषेध मोर्चा काढला. पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश मोडणाऱ्या आव्हाडांसह नजीब मुल्ला, नगरसेवक मिलिंद पाटील, शानू पठाण, अमित सरैय्या, मनोहर साळवी, सुहास देसाई आणि मुकुंद केणी आदी १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)