विदर्भाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचा गोंधळ
By admin | Published: August 1, 2016 07:33 PM2016-08-01T19:33:52+5:302016-08-01T19:33:52+5:30
वेगळ्या विदर्भावरुन एकीकडे भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्यात वाद होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय भुमिका घ्यावी ? याबाबत गोंधळलेला दिसत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 01 - वेगळ्या विदर्भावरुन एकीकडे भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्यात वाद होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय भुमिका घ्यावी ? याबाबत गोंधळलेला दिसत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अधिवेशनात भाजपाला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर धारेवर धरलं असताना केंद्रातील नेते मात्र वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आपण असल्याचं सांगत आहे. यामुळे वेगळ्या विदर्भाऐवजी राष्ट्रवादीचे नेतेच वेगळे झाले असल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शवले होते. त्यामुळे मित्रपक्ष शिवसेनासह राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाचा विरोध करण्यास सुरुवात केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. मात्र ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमचा वेगळ्या विदर्भाला विरोध नसल्याचं सांगितलं आहे. आता राज्यातले नेते ठाम की केंद्रातले नेते बरोबर यावरुन जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झाल्याच दिसतं आहे.
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा फक्त राजकारण म्हणून वापरला जात आहे, असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या प्रतिक्रिया कळवा