शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशीच आघाडी करणार- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 11:21 IST

राजकारणात कधीच कोणी निवृत्त होत नसतो, याची प्रचिती 75 वर्षीय शरद पवार नेहमीच सर्वांना करून देत असतात. एवढ्या वयातही त्यांच्यासारखा राजकारणात चाणाक्ष व्यक्ती नाही.

मुंबई- राजकारणात कधीच कोणी निवृत्त होत नसतं, याची प्रचिती 75 वर्षीय शरद पवार नेहमीच सर्वांना करून देत असतात. एवढ्या वयातही त्यांच्यासारखा राजकारणात चाणाक्ष व्यक्ती नाही. मुंबईत संविधान बचाव रॅलीच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसबरोबरच्या आघाडीवर सूचक वक्तव्य केलं आहे.आम्हाला आघाडी करायची असल्यास काँग्रेसलाच प्राधान्य देऊ, येत्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत फक्त काँग्रेसशीच आघाडी करू, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. संविधान बचाव रॅलीवर पवार म्हणाले, सरकारमधील एका मंत्र्यानं मंचावरून सांगितलं की, आमचा पक्ष संविधान बदलण्यासाठीच सत्तेवर आला आहे. मात्र नंतर त्यांनी त्यांचं ते विधान मागे घेतलं. या प्रकारामुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे.देशाला वाचवण्यासाठी संविधान बचाव रॅलीची आवश्यकता आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आघाडी करण्यासंदर्भात मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींसोबत दोनदा बोलणी केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही विदर्भात एक संयुक्त कार्यक्रमही केला होता. जर आम्ही एकत्र आलो तर सत्ताधा-यांना मजबूत पर्याय देऊ शकतो. तसेच शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केलं.शिवसेना शेवटपर्यंत लोकसभा स्वबळावर लढवण्याचा भूमिकेवर ठाम राहिल्यास यात शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. शिवसेनेकडेही लोकसभेसाठी योग्य उमेदवार आहेत. युतीत असतानाही भाजपानं त्यांच्याशी दुर्व्यवहार केला आहे. स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे त्यांना ताकद मिळणार आहे, असे सूतोवाचही शरद पवार केले आहेत

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMumbaiमुंबई