शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Maharashtra Politics: “शरद पवारांना सांगूनच एकनाथ खडसेंची अमित शाहांशी चर्चा”; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:56 IST

Maharashtra News: एकनाथ खडसेंची भाजपवापसी होण्याबाबत होत असलेल्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मात्र, यातच आता भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना याबाबत माहिती आहे, असा खुलासा करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे हे अमित शहांना भेटणार होते. खडसे एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांसोबत ते जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्यामुळे खडसे भाजपमध्ये जाणार, हे जे वृत्त दिले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, असे महेश तपासे यांनी सांगितले.  एकनाथ खडसेंना काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले की, एकनाथ खडसेंनीही याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे पद आणि महाराष्ट्रातल्या पक्षाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खडसे यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा विषय चुकीचा आहे अशी काही परिस्थिती नाही, असे महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दसरा मेळावा हा मूळचा शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा ठाकरेंची आणि शिवसेनेची आहे. पण वाद निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या विकोपाला राजकारण जाता कामा नये. महाराष्ट्राच्या ते हिताचं नाही. जनावरांमधील लंपीचा आजार, पुराची स्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवार