शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:59 IST

"...याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत आणि ही चांगली गोष्ट नाही." 

काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोदीपक्ष नेते राहुल गांधी, हे सातत्याने मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर "मतचोरीचा" आरोप करत आहेत. यातच आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला आहे. "राहुल गांधी किंवा इतरांनी निवडणूक आयोगासंदर्भात टीका टिप्पणी केली, की भाजप नेते उत्तर देतात.  याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत," असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.  

यावेळी, राहुल गांधी यांच्या निडवणूक आयोगावरील आरोपासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "राहुल गांधी आणि अन्य काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांचा रोख जो आहे, तो निवडणूक आयोगाच्या एकंदरित कामाच्या पद्धतीवर आहे. राहुल गांधी हे संसदेत विरोदीपक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष हीसुद्धा एक इन्स्टिट्यूशन आहे. यामुळे ते  जे सातत्याने मांडत आहेत, त्याची नोंद संबंधित संस्थेने घ्यायला हवी."  

"...याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत"पवार पुढे म्हणाले, "आज घडतेय काय? की राहुल गांधी किंवा इतरांनी निवडणूक आयोगासंदर्भात टीका टिप्पणी केली, की त्याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. त्याचे उत्तर, आज भाजपचे नेते देत आहेत. हा विषय त्यांचा नाही, हा विषय निवडणूक आयोगाचा आहे. पण आयोग राहिलं बाजूला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी हेच त्याची उत्तरं देत आहेत. याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत आणि ही चांगली गोष्ट नाही." 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधी