शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची खात्री नव्हती”; शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:30 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावरून अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप तसेच शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपचा ३० वर्षांचा गड उद्ध्वस्त करणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. यातच रवींद्र धंगेकर विजयी होईल, याची खात्री नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. 

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र धंगेकरांचा विजय हा वैयक्तिक होता, असे म्हटले. हरकत नाही. या उमेदवाराला तिकीट देण्यात आमचे व्हिजन होते, हे तर त्यांनी मान्य केले. रवींद्र धंगेकर यांनी मागील तीस वर्षे जे काम केले त्याला लोकांनी मते दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.

कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची खात्री नव्हती

कसब्यात यश मिळेल असे सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होते. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती. हे मुख्य कारण आहे. कसब्यात गिरीश बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले होते. ते लोकांमध्ये असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचे लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असे वाटत होते. पण  या उमेदवाराचे काम परिणामकारक ठरले. हा उमेदवार कधीच चारचाकीत बसत नाही. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे दोन पायांवर चालणाऱ्यांनी यांना मते दिली, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथील सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, असा दावा करण्यात आला आहे. यावर बोलताना, उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच भूमिका माडंतायत आणि या तीन पक्षांची ताकद कालच्या सभेत दिसली, असे शरद पवार यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी