शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, अज्ञानामुळे ते विधान”; शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 13:02 IST

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis: त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल, असे सांगत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेकविध घडामोडींवरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. अज्ञानामुळे असे विधान केले असेल, यावर अधिक भाष्य करायची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडवणीस यांनी १९७७ मधील घडामोडींचा संदर्भ देताना, शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपबरोबर सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्षं चालले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्षं चालले असते. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केले ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? असे कसे चालेल? असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील

यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगावे. १९७७ साली आम्ही सरकार बनवले. पण त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवले ते सगळ्यांना घेऊन केले. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. त्यामुळे ते अज्ञानापोटी अशी स्टेटमेंट करतात यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बैठकीची गरज काय होती. पण मुंबईमध्ये मित्र पक्षांची बैठक भाजप घेणार असल्याची बातमी वाचण्यात आली. मग तुम्हाला बैठका घेता येतात इतरांनी घेतल्या तर त्यात चुकीचे काय. मॅच्युअर पॉलिटीक्सची कमतरता आहे, एवढेच मी याबाबत म्हणू शकेल, असे शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस