शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे ठोके !

By admin | Updated: August 19, 2014 00:52 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत नागपूर शहरात राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून दावेदारी अर्ज स्वीकारले जात आहेत.

उपराजधानीत ३६ जणांचे अर्ज : मुंबईला होणार मुलाखतीनागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत नागपूर शहरात राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून दावेदारी अर्ज स्वीकारले जात आहेत. शहरातील सहा जागांसाठी राष्ट्रवादीच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे. सर्वाधिक अर्ज पश्चिम नागपूरच्या जागेसाठी आले आहेत. यात सलील देशमुख यांच्यासह शहर अध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका प्रगती अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, विजय तालेवार, गंगाप्रसाद ग्वालबंशी व योगेश मेश्राम आदींचा समावेश आहे. पूर्व नागपुरातून नगरसेवक दुनेश्वर पेठे व पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, दक्षिणमधून सुनील राऊ त, नगरसेवक राजू नागुलवार, उत्तर मतदारसंघात रमेश फुले, महेंद्र भांगे, शरद नागदिवे तर मध्य नागपूर मतदारसंघावर रमण ठवकर, अनिल अहिरकर, योगेश कुंभलकर व बबीता मेहर आदींनी दावा केला आहे. बुधवारपर्यंत इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार असून, त्याच दिवशी पक्षाच्या प्रदेश कमिटीकडे पाठविले जाणार असल्याची माहिती अजय पाटील यांनी दिली. इच्छुकांच्या मुंबईला मुलाखती होतील. परंतु आघाडी कायम राहिली तर पक्षाच्या वाट्याला येतील त्याच जागा लढवाव्या लागतील. आघाडी न झाल्यास सर्व जागांची लढविण्याची पक्षाची तयारी असल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)