शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar: "फडणवीसांची कार्यशैली भारावणारी...", रोहित पवारांनी केलं उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 19:32 IST

राजकारणात कधीच कुणी कुणाचा शत्रु नसतो नसं म्हणतात. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामं करुन घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि खास करुन विरोधी पक्षातील आमदारांना सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेच लागतात.

मुंबई- राजकारणात कधीच कुणी कुणाचा शत्रु नसतो नसं म्हणतात. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामं करुन घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि खास करुन विरोधी पक्षातील आमदारांना सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेच लागतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कट्टर विरोधी असले तरी काही राजकीय पटलावर हे दोन्ही पक्ष कधी एकत्र येतील याचाही काही नेम नाही. त्यात नुकतंच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. मतदार संघातील काही कामांसाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. 

धनंजय मुंडे यांच्या फडणवीस भेटीचं उदाहरण ताजं असतानाच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी एमपीएससीशी निगडीत एका प्रश्ना संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं होतं. फडणवीसांनी रोहित पवारांच्या निवेदनाची दखल घेतली. याच बाबत रोहित पवार यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. पण आभार व्यक्त करतानाच रोहित पवार यांनी फडणवीसांच्या कामाच्या वेगाची तुलना थेट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केली आहे. 

काय म्हणाले रोहित पवार?रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी MPSC च्या कक्षेबाहेरील सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता एमपीएससी मार्फतच भरल्या जाव्यात या मागणीसाठी रोहित पवारांनी फडणवीसांची भेट घेतली. "MPSC च्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता MPSC मार्फतच भराव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं. फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते", असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.