शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

“लवकरच घरी जेवायला या, काहीतरी स्पेशल करते;” सुप्रिया सुळेंचं चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:19 IST

Supriya Sule On Chandrakant Patil : सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं खास आमंत्रण.

Supriya Sule On Chandrakant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी घरी जेवायला येण्याचं खास आमंत्रण दिलं आहे. झी मराठीवर येणाऱ्या सुबोध भावे यांच्या बस बाई बस या कार्यक्रमात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. याचदरम्यान त्यांनी चंद्रकांत पाटलांना घरी जेवायला येण्याचं आमंत्रणही दिलं.

पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंना घरात लक्ष द्यावं असं म्हटलं होतं. त्या वर सुप्रिया सुळे यांनी बोलताना हसत उत्तर दिलं. “घरी वहिनींना सांगा मी विचारलं आहे आणि लवकर घरी जेवायला या. तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी करते,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझे सर्व पक्षीय लोकांशी संबंध चांगले आहेत, असंही त्या म्हणाल्या. सुबोध भावे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी चंद्रकांत पाटलांना घरी आमंत्रित केलं.यावेळी सुप्रिया सुळे यांना घरी काम करण्याचा त्यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल प्रशअन विचारण्यात आला. “मला त्याचं फार काही वाटलं नाही. मी एक महिला आहे. होममेकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजत नाही. विरोधक जे बोलतात ते मनाला लावून घेत नाही,” असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSubodh Bhaveसुबोध भावे Zee Marathiझी मराठी