शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

राष्ट्रवादीला चार, सेनेकडे दोन जागा

By admin | Updated: June 9, 2017 02:51 IST

तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमधील सहा जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध काढून राष्ट्रवादीने विजयी सलामी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमधील सहा जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध काढून राष्ट्रवादीने विजयी सलामी दिली. उर्वरित तीन जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत एका जागेवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले तर दोन ठिकाणी शिवसेनेने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडली. त्यामुळे गोवे व तिसे या राष्ट्रवादीचा दोन ठिकाणी झालेला पराभव राष्ट्रवादी नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. रोहा तालुक्यातील सहा जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत भालगाव ग्रामपंचायतीमधून संजीवनी मोहिते (राष्ट्रवादी), तांबडी ग्रामपंचायतीमधून दिव्या जाधव (राष्ट्रवादी), ऐनवहाळ ग्रामपंचायत सुनीता इंदुलकर (राष्ट्रवादी) या तिन्ही जागा बिनविरोध काढण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे छबी संभाजी म्हसकर (७७ मते) यांचा दारुण पराभव करीत कविता महाबळे (राष्ट्रवादी) यांनी सहजगत्या विजय खेचून आणला. एकूण ४३३ झालेल्या मतदानापैकी कविता महाबळे यांना ३५२ मते मिळवित ७७ मतांनी विजयी झाल्या आहेत.तिसे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समिक्षा वडे यांनी २१५ मते मिळवत राष्ट्रवादीच्या सायली वडे यांचा १९ मतांनी पराभव केला. तर गोवे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे संदेश झोलगे यांनी २३८ मते मिळवित राष्ट्रवादीच्या ऋ तुजा पवार (२१३ मते) यांचा २५ मतांनी पराभव केला. गोवेत पक्षातील गोंधळी कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. एकंदरीत सहापैकी तीन जागा बिनविरोध काढल्यानंतर तीन जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.