ठाणे : जिल्ह्यातील १२४ पैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नुकतेच निकाल जाहीर झाले आहे. यातील ५९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याचे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यात १२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या, तर उर्वरित शहापूर तालुक्यातील ६५ पैकी ४० ग्रामपंचायती राष्ट्रवादीने मिळवल्या आहेत. तालुक्यातीलसहा ग्रा.पं. उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असता उर्वरित ५९ ग्रा.पं.साठी ८६ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.मुरबाड तालुक्यातील उमरोली, तळेगाव आणि आंबेळे या तीन ग्रामपंचायतींसाठी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे मुरबाडच्या २६ पैकी १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या आहेत.
५९ ग्रामपंचायती मिळवल्याचा राष्ट्रवादीचा दावा
By admin | Updated: April 26, 2016 04:11 IST