शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला न जाण्याच्या भूमिकेला पाठिंबा; शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 17:02 IST

New Parliament Inauguration row: नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

New Parliament Inauguration row: २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत २० पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. तर, भाजपसह १७ पक्ष सहभागी होणार आहेत. यातच आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला न जाण्याच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठिंबा दिला असून, केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

मीडियाशी बोलताना शरद पवार म्हणाले की, संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचे उद्घाटन करावे, हे सुद्धा मान्य करण्यात आलं नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचले

अनेक वर्षापासून संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचले. असा महत्त्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतले नाही. आता इमारत तयार झाली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना विधीमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याचे म्हटले जात आहे.  यावर बोलताना, याचा अर्थ असा आहे, की निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम निर्णय आल्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल, असे शरद पवार म्हणाले. 

दरम्यान, विरोधकांनी बहिष्काराची भूमिका घेतली असली तरी केंद्रातील मोदी सरकारकडून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. याची एक कार्यक्रमपत्रिका समोर आली आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीतील वाहतुकीत बदल करण्यात येत असून, त्यासंदर्भातील माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारParliamentसंसद