शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात! अदानीचे पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:27 IST

Maharashtra News: मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खून होत असल्याची टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: BBC च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. सूत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयसोडून घरी जाण्यास सांगण्यात आले. यानंतर आता या कारवाईवरून विरोधक आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. अलीकडेच बीबीसीने पंतप्रधान मोदींवर तयार केलेल्या एका माहितीपटावर बंदी घालण्यात आली. 

राज्यातील महाविकास आघाडीचे नेते तसेच देशातील विरोधी पक्षही आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून भाजप तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. बीबीसीवरील कारवाईवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अगोदर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे, असे ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.

अदानीचे पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी

अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यात, देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात ! अदानी चे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर IT च्या धाडी.. मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खुन ! जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे, असे ट्विट करत अमोल मिटकरींनी टीका केली. तसेच या ट्विटसह जागो भारतवासी असा हॅशटॅग दिला आहे. 

दरम्यान,  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बीबीसीवरील कारवाईवरून मोदी सरकारवर टीका केली. BBC ने मोदींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आणि लगेच BBC च्या कार्यालयावर IT च्या धाडी पडू लागल्या. ५६ इंचाच्या छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले, अशी खोचक टीका पटोलेंनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीCentral Governmentकेंद्र सरकार