शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हिरमुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:27 IST

विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

अभिमन्यू कांबळेपरभणी : विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुर्राणी हे करीत आहेत़ राष्ट्रवादीने तीन दिवसांपूर्वी आ़ दुर्राणी यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याच्या उद्देशाने एबी फॉर्मही दिला होता़ त्यानंतर आ़ दुर्राणी यांनी ३ मे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते़ त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजेपासूनच शहरातील राष्ट्रवादी भवन येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी जमा झाले होते. पण सकाळी १०च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी आघाडीतील जागा वाटपानुसार परभणीची जागा काँग्रेसला सोडली असून, तुम्ही उमेदवारी दाखल करू नका, असे आ़ दुर्राणी यांना सांगितले़ त्यानंतर दुर्राणी यांनी खा़ पवार यांना पक्षाने घेतलेला निर्णय आपणास मान्य असल्याचे सांगितले़पक्षाच्या परभणी मनपातील १९ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी चालविली़ काही जि़प़ सदस्यही सामूहिक राजीनाम्याची भाषा करू लागले़ वातावरण गरम झाले़ त्यानंतर आ़ दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, आ़ विजय भांबळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली़याच वेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख व जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर हेही राष्ट्रवादी भवनमध्ये दाखल झाले़ त्यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे सांगून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले़