शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

नक्षलवादी करतात मोबाईलचा वापर

By admin | Updated: September 22, 2014 00:58 IST

मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा वापर ही अगदीच सहज बाब आहे. मोठ्या संख्येतील खतरनाक गुन्हेगारांसोबत काही नक्षलवाद्यांनाही येथे मोबाईल उपलब्ध करून दिल्या जात असल्याची खळबळजनक

सूरजचा धक्कादायक खुलासा: यंत्रणा हादरली नागपूर : मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा वापर ही अगदीच सहज बाब आहे. मोठ्या संख्येतील खतरनाक गुन्हेगारांसोबत काही नक्षलवाद्यांनाही येथे मोबाईल उपलब्ध करून दिल्या जात असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. कारागृहच नव्हे तर देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या या गंभीर प्रकारात मोठ्या पदावरील कारागृहातील अधिकारीसुद्धा सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. कारागृहातील ‘साहेबांचा लाडका’ असलेल्या सूरज श्याम अरखेल याला सदर पोलिसांनी अपहरणाच्या आरोपात अटक केली आहे. पोलीस कस्टडीत सूरजला बोलते करण्याचे प्रयत्न केले जात आहे. ‘साहेबां’च्या रागावरच कारागृहातून पळून जाणाऱ्या सूरजला पुन्हा कारागृहातच जावे लागणार आहे. त्यामुळे सूरज पोलिसांपुढे तोंड उघडण्यास टाळाटाळ करीत आहे. जे बोलतो ते विचारपूर्वक बोलत आहे. मात्र, त्याने विचारपूर्वकच केलेल्या गौप्यस्फोटामुळे तपास यंत्रणेलाही घाम फुटला आहे. मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा ठोठावण्यात आलेले दहशतवादी, अनेक कडवे नक्षलवादी तसेच मुंबई अंडरवर्ल्डशी जुळलेले काही कैदीही येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. दहशतवादी आणि कडव्या नक्षलवाद्यांना अंडासेलमध्ये बंदिस्त करून ठेवले जाते. इतर नक्षल्यांसाठी वेगळी बराक असते. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि बावा (कारागृह अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कैदी, जे एक प्रकारे पोलिसांच्याच भूमिकेत आतमध्ये वावरतात, अशा कैद्यांना ‘बावा’ म्हणतात.) यांच्याशिवाय दुसऱ्यांना त्यांच्या आजूबाजूलाही फटकू दिले जात नाही. सूरज बावा म्हणूनच वावरायचा. एवढेच नव्हे तर ‘साहेबांचा लाडका बावा!’ म्हणून त्याची ओळख होती. त्याला आतबाहेर जाण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नव्हती. त्याची कुणी झडतीही घेत नव्हते. तो बगिच्यात फिरावा तसा कारागृहाच्या आत-बाहेर फिरत होता.साहेबांच्या मर्जीने कारागृहात अनेक दिवसांपासून ‘मोबाईल रॅकेट’ चालविले जाते. कैद्यांना त्यांच्या आप्तस्वकीयांशी, मित्रांशी बातचित करण्यासाठी मोबाईल उपलब्ध करून दिले जातात. त्या बदल्यात त्याच्याकडून मोठी रक्कमही उकळली जाते. कारागृहातील कैद्याकडे जरी पैसे राहात नसले तरी त्याच्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून मनिआॅर्डर करवून किंवा भेटीला बोलवून रक्कमही मागून घेतली जाते. हा गैरप्रकार कैद्यापुरताच मर्यादित नसून, नक्षलवादीहीही त्याला अपवाद नाही. मोबाईल वापरण्याच्या बाबतीत कारागृहात कुणीच मागे नसल्याची माहिती सूरजच्या बोलण्यातून पुढे आल्याचे सूत्र सांगतात. सूरज स्वत:च अनेक कैद्यांना संभाषणासाठी मोबाईल उपलब्ध करून देत होता.या धक्कादायक खुलाशामुळे पोलीस अधिकारी घामाघूम झाले आहेत.(प्रतिनिधी)कारागृहात सुरूंग सूरजचे कारागृहातून दिवसाढवळ्या पलायन, त्यानंतर लगेच त्याने केलेले अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने केलेल्या खुलाशांमुळे कारागृहातील अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे. पोलीस कस्टडीत सूरज मात्र विचारपूर्वक बोलतो आहे. त्याने दिलेल्या माहितीमुळे कारागृहातील सुरक्षेला सुरूंग लावणाऱ्या ‘साहेबांच्या’अडचणी वाढल्या आहेत.गंभीर परिणामांमुळे सारेच स्तब्ध सुरक्षेला आव्हान देणारे बंदिस्त नक्षलवादी किंवा खतरनाक गुंडांकडून मोबाईलचा वापर केला जात असेल तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच संबंधितांची झोप उडाली आहे. त्याचमुळे आता सूरज काय बोलतो त्याची माहिती बाहेर जाऊ नये, असेही खास निर्देश सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते.