कमलापूर (जि़ गडचिरोली) : पोलिसांचा हेर असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तरुणाची गळा कापून हत्या केली. नरेंद्र मदनय्या येर्रावार (२४) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना अहेरी तालुक्यातील ताटीगुडममधील कोंबडा बाजारात रविवारी दुपारी १च्या सुमारास घडली़ नरेंद्र ताटीगुडम येथे कोंबडा बाजारात गेला असल्याची माहिती नक्षल्यांना मिळाली. नक्षल्यांनी नरेंद्रचा शोध घेऊन त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, पळ काढण्याचा प्रयत्न केला असता नक्षल्यांनी पाठलाग करून नरेंद्रला पकडले. त्यानंतर त्याची गळा कापून हत्या केली. तो ज्या दुचाकीने आला होता, त्या दुचाकीलाही आग लावली व नक्षलवादी जंगलात पळून गेले. याबाबतची माहिती रेपनपल्ली पोलीस स्टेशनला देण्यात आली. मात्र पोलिसांनी घटनास्थळावर जाण्यास नकार दिल्याने नातेवाइकांनी नरेंद्रचा मृतदेह ट्रॅक्टरमध्ये टाकून रेपनपल्ली येथे आणला. नरेंद्रहा यापूर्वी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून काम करीत होता, असे सूत्रांकडून समजते़ (वार्ताहर)
नक्षल्यांनी चिरला तरुणाचा गळा
By admin | Updated: February 9, 2015 06:26 IST