शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

गोंदियात नक्षली हल्ल्याचा कट उधळला; पोलिसांना उडविण्यासाठी पेरले होते सुरुंग

By admin | Updated: April 26, 2017 02:24 IST

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियनवर केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले असतानाच

केशोरी (गोंदिया) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियनवर केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले असतानाच, गोंदियात भूसुरुंगाद्वारे पोलिसांना उडवण्याचा नक्षलींचा कट मंगळवारी उधळून लावला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली ते बोरटोल या गावांदरम्यान जंगलातील डांबरी रस्त्यालगत नक्षलवाद्यांनी आपले बॅनर लावल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. तेंदू कंत्राटदारांना इशारा देणारे हे बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवल्याचे वेळीच लक्षात आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने सायंकाळी ते निकामी केले. बॅनरच्या निमित्ताने पोलिसांना त्या ठिकाणी येण्यास प्रवृत्त करायचे आणि भूसुरुंग उडवून घातपात घडवायचा, असा नक्षलवाद्यांचा डाव होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा घातपात टळला. बॅनरच्या जवळच तीन भूसुरुंग पेरलेले होते. जमिनीत स्टीलच्या डब्यात दारूगोळा भरून त्याला प्रेशर बॉम्ब बनविले होते. याशिवाय डिटोनेटर्सचा वापर करून टायमरसुद्धा लावलेले होते. प्रेशर बॉम्ब म्हणून त्या भूसुरुंगाने काम न केल्यास, पोलीस तो डबा उघडण्यासाठी जातील आणि झाकण उघडताच टायमर सुरू होऊन काही क्षणात बॉम्ब फुटेल, अशी व्यवस्था केली होती. मात्र, भूसुरुंगाची एक वायर पोलिसांना दिसल्यानंतर, काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी सावधपणे परिसरात तपासणी केली. गोंदियावरून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. त्यांनी ते भूसुरुंग निकामी केले. विशेष म्हणजे, भरनोली येथे पोलिसांचे सशस्त्र दूरक्षेत्र केंद्र (एओपी) आहे. तिथे २४ तास सशस्त्र पोलिसांचा ताफा असतो. तेथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी भुसुरूंग पेरून बॅनर लावण्याची हिंमत केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पोलीस सतर्क बॅकफूटवर गेल्याचा बनाव निर्माण करणाऱ्या माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये अचानक आक्रमक होत क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. अवघ्या ४३ दिवसात तीन मोठ्या घातपाती घटना घडवत ३९ जवानांचे बळी घेतले. माओवादी गडचिरोली-गोंदियातही घातपात घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. नक्षल्यांनी दीड महिन्यात जाळपोळ, हल्ले आणि चकमकीच्या ११ घटना घडवल्या. ४ महिन्यात ५ निरपराध नागरिकांची हत्या केली असून कोणत्याहीक्षणी नक्षल्यांकडून गडचिरोली-गोंदियात ‘सुकमा’ची पुनरावृत्ती घडवून आणण्याचे संकेत असून पोलीस सतर्क झाले आहेत. (वार्ताहर)सुकमा हल्ला; नक्षलवाद्यांकडे होते रॉकेट लाँचर, एके-४७ रायफलसीआरपीएफच्या बटालियनवर हल्ला करण्यासाठी नक्षलींनी एके-४७ सारख्या शस्त्राचा वार केला. एवढेच नाही, तर त्यांच्याकडे रॉकेट लाँचर होते, अशी माहिती या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानने दिली आहे. सकाळी ८.३० वाजता ७४ व्या बटालियनचे सुमारे ९९ जवान दुर्गपाल छावणी सोडून चिंतागुफात पोहोचले. तेथे ते दोन गटांत रस्त्याच्या दोन बाजूंनी विभागले. त्या भागात ३००-४०० नक्षलवादी लपून बसले होते. नक्षलवाद्यांनी अचानक त्यांना घेरले.हल्लेखोरांनी आयईडी स्फोटकांनी हल्ला केला व नंतर दुपारी १२.२५ वाजता त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी या वेळी एके-४७ सारख्या शस्त्रांचाही वापर केला. या हल्ल्यामागे हिदिमा हा त्यांचा नेता होता.२२ शस्त्रे गायब : या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या या तुकडीचे २२ शस्त्रे गायब झाल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात १२ एके-४७ रायफल, चार एकेएम रायफल, दोन इंसास लाइट मशिन गन, तीन इंसास रायफल यांचा समावेश आहे. शिवाय जवानांकडील अन्य साहित्यही नक्षलींनी पळवले आहे.

नक्षलवाद्यांशी लढण्याच्या धोरणाचा सरकार फेरआढावा घेईल. नक्षलवाद्यांचा हिंसाचार समूळ नष्ट करण्याचे मार्ग शोधण्यासाठी नक्षलग्रस्त राज्यांची बैठक ८ मे रोजी घेतली जाईल.- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री