शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मेपूर्वी नालेसफाई

By admin | Updated: April 7, 2017 01:18 IST

स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह सदस्यांनी स्थापत्य, आरोग्य आणि जलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला

पिंपरी : स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह सदस्यांनी स्थापत्य, आरोग्य आणि जलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रश्न जाणून घेतले. उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. आरोग्य विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सूचना मागविल्या आहेत. मे महिन्यात नालेसफाई सुरू करण्यात येणार असल्याचे, प्रशासनाने सांगितले.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आरोग्य अधिकारी, पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्यासह विविध विभागांतील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीविषयी माहिती देताना सावळे म्हणाल्या, ‘‘नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे. अर्थसंकल्पातील तरतुदीचा उपयोग करून चांगली कामे केली पाहिजे. विकासकामे करण्यासाठी तरतूद करण्यात येईल. यंत्रणा, साहित्य देऊ.’’ (प्रतिनिधी)शंभर कोटींची बिले थकलेलीपिंपरी : महापालिका अधिकारी, प्रशासन, स्थायी समिती सदस्य, ठेकेदार यांची आज बैठक झाली. त्या वेळी गेल्यावर्षातील शंभर कोटींची बिले थकीत आहेत, असे निदर्शनात आणून दिले. त्यावर चर्चा होऊन, आर्थिक वर्षातील बिले त्याच कालखंडात देण्यात यावीत, अशी सूचना समितीने केली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त दिनेश वाघमारे, मुख्यलेखा परीक्षक राजेश लांडे, ठेकेदार, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. चालू अंदाजपत्रकावर थकबाकीचा बोजाठेकेदारांनी आपल्या कामांची बिले ३१ मार्चपूर्वीच द्यावीत, असे लेखा विभागाने सूचित केले होते. यासंदर्भात बैठक झाली. याविषयी सावळे म्हणाल्या, ‘‘गेल्या वर्षाच्या कालखंडातील ठेकेदारांची शंभर कोटींची बिले थकली आहेत. ठेकेदारांची बिले देण्याबातही बैठक झाली. मात्र, त्यामध्ये तोडगा निघाला नाही. गतवर्षीच्या बजेटमधून बिले द्यायची की चालू अंदाजपत्रकातून याची चर्चा सुरू आहे. थकलेल्या बिलांचा या अंदाजपत्रकावर बोजा पडणार असून विकासकामांना निधी अपुरा पडू शकतो.’’आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. मात्र, कर्मचाऱ्यांनी कामाच्या बाबतीत कामचुकारपणा करू नये, कामाच्या वेळेत कामच करावे, थम्ब इंम्प्रेशनऐवजी कर्मचाऱ्यांना स्फेस रिडर कंपलसरी केले आहे. मुजोर कामगारांचे यापुढे लाड खपवून घेतले जाणार नाही. जे काम आहे, ते कर्मचाऱ्यांनी केलेच पाहिजे. गणवेशापासून ते मास्कपर्यंतची सर्व सेवासाधने पुरविणे महापालिकेसह कंत्राटदारांना बंधनकारक आहे.- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती निविदा काढण्यात दिरंगाई बैठकीत नालेसफाई, नदीपात्रातील जलपर्णी काढणे, धूर फवारणीचाही आढावा घेतला. जलपर्णी बेसुमार वाढली असून, डासांमुळे रहिवाशांचे जगणे मुश्किल झाल्याचा आरोप नगरसेविका आशा शेंडगे यांनी केला. त्या वेळी जलपर्णी काढण्यासाठी निविदाच काढली नसल्याचे उघड झाले. त्यावर जलपर्णी काढण्याची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाल्याची माहिती दंडवते यांनी दिली. अखेरीस, तातडीने जलपर्णी काढण्याचे आदेश सावळे यांनी दिले. त्यावर १ मेपासूनच नालेसफाई कामे सुरू करणार असल्याचे दंडवते यांनी स्पष्ट केले.