शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर नवाब मलिकांचं चार शब्दांचं ट्विट, म्हणाले, आ रहा हूँ मै

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:38 IST

Devendra Fadnavis Vs Nawab malik : देवेंद्र फडणवीस यांनी आज आरोपांचा बॉम्ब फोडताना Nawab malik यांच्यावर त्यांचा Underworldशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. नवाब मलिक यांनी Devendra Fadnavis यांच्या आरोपांना ट्विट करून उत्तर दिले आहे.

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी आज आरोपांचा बॉम्ब फोडताना नवाब मलिक यांच्यावर त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. फडणवीस यांनी यासंदर्भातील कागदपत्रेही पत्रकार परिषदेमधून माध्यमांसमोर ठेवली. दरम्यान, नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना ट्विट करून उत्तर दिले आहे. मलिक यांनी आ रहा हूँ मै, असे ट्विट करत फडणवीस यांना पत्रकार परिषदेमधून प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक काय बोलतात आणि फडणवीसांना काय प्रत्युत्तर देतात. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? २००३ मध्ये नवाब मलिक मंत्री होते. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल त्यांनी केला.

तसेच केवळ १ संपत्ती नव्हे तर अशा ५ मालमत्ता आहेत ज्यात अंडरवर्ल्डचा संबंध आहे. माझ्यासाठी सलीम जावेदचा सिनेमा नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते तपास यंत्रणांना देणार आहे. हे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहे. NCP मंत्री काय कांड करतात हे त्यांनाही माहिती कळू द्या असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणunderworldगुन्हेगारी जगत