शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Nawab Malik : "यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?", नवाब मलिकांकडून मध्यरात्री 'फोटोबॉम्ब'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 08:33 IST

Nawab Malik : नवाब मलिकांच्या या फोटोबॉम्बवर समीर वानखेडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेसमीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, आता मध्यरात्रीची वेळ साधत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट करत सवालही केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. नवाब मलिकांच्या या फोटोबॉम्बवर समीर वानखेडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याबाबत नवाब मलिक यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. पण, फोटोवरूनच सवाल केला आहे. 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असे प्रश्नार्थक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. या फोटोवर नवाब मलिक आज, सोमवारी अधिक स्पष्टीकरण देण्याची शक्यता असून त्यावर समीर वानखेडे हे आपले काय मत मांडतात, हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. 

नवाब मलिक हे सध्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा आहे. तिथे गेल्यावरही समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असा नवाब मलिक यांचा दावा आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

दुसरीकडे, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनीही या प्रकरणात उडी घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे. निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी कालच समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असे लिहिलेले आहे. यानंतर आता नवाब मलिक यांनी हा फोटोबॉम्ब टाकला आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडे