मुंबई : नेव्हीच्या जवानाकडून नेव्हीच्याच दुसऱ्या जवानाच्या पत्नीचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी कफपरेड येथे घडली. विजय धेके (३२) असे आरोपी नेव्हीच्या जवानाचे नाव असून, कफपरेड पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे.नेव्ही वसाहतीत तक्रारदार ४० वर्षीय महिला पतीसोबत राहत आहे. तक्रारदार महिलेचे पती देखील नेव्हीत आहेत. धेके आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात. ७ मे रोजी घरात पाणी येत असल्याची माहिती विचारण्याच्या बहाण्याने धेकेने महिलेचा हात पकडला होता, याची माहिती तिने पतीला दिली. मंगळवारी महिलेने पतीसह कफपरेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून धेकेला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे कफपरेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद बरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नेव्हीच्या जवानाकडून महिलेचा विनयभंग
By admin | Updated: May 14, 2015 02:35 IST