मुंबई - नवरात्रौत्सव, दिवाळीसाठी मध्य रेल्वेकडून दादर-सावंतवाडी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. त्याच्या १८ फेऱ्या होतील. या ट्रेन ११ आॅक्टोबरपासून एक महिन्यासाठी सोडण्यात येतील, तसेच एलटीटी-नागपूर सुपरफास्ट विशेष ट्रेन सोडण्यात येणार असून, त्याच्या १४ फेऱ्या होणार आहेत. या ट्रेनही १0 आॅक्टोबरपासून ते २१ नोव्हेंबरपर्यंत सोडण्यात येतील. आठवड्यातून एकदा ही ट्रेन धावेल.
नवरात्रौत्सव, दिवाळीसाठी म.रे.कडून विशेष ट्रेन
By admin | Updated: October 9, 2015 01:37 IST