शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांची जलपर्यटनाला पसंती

By admin | Updated: May 19, 2016 03:09 IST

उन्हाळी सुट्यांमध्ये बच्चेकंपनीबरोबरच थोरामोठ्यांनाही पर्यटनाचे आकर्षण वाटते.

नवी मुंबई : उन्हाळी सुट्यांमध्ये बच्चेकंपनीबरोबरच थोरामोठ्यांनाही पर्यटनाचे आकर्षण वाटते. वाशी मिनी सी शोअर येथे जलपर्यटन सुरू झाले असून, नवी मुंबईतील नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हिंदजल प्रवासी वाहतूक सरकारी संस्थेच्या वतीने जानेवारीमध्य सुरू केलेल्या बेलापूर ते एलिफंटा फेरीबोट सेवेलाही पर्यटकांची गर्दी पाहता, नवी मुंबईकरांचा जलपर्यटनाकडे असलेला कल दिसून येतो. नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वाशी मिनी सी शोअरला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्या परिसरातील उद्यानांमध्येही बच्चेकंपनीनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळते. काहीच दिवसांपूर्वी येथे बोटिंग सेवा सुरू करण्यात आली असून, या जलपर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी तरुणवर्गाबरोबरच ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने भेट देत असून, जलपर्यटनाचा मनमुराद आस्वाद घेताना पाहायला मिळतात. ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत दर आकारले जात असून, तासभराची सैर करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटांतील नागरिकांनी गर्दी केली आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिकही मिनी सी शोअर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असून, संध्याकाळी त्याहीपेक्षा अधिक गर्दी पाहायला मिळते.