शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गसौंदर्याची तोरणमाळ

By admin | Updated: July 2, 2016 03:56 IST

महाबळेश्वरनंतरचे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ.

महाबळेश्वरनंतरचे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ. समुद्रसपाटीपासून सुमारे ११४३ मीटर उंचीवर असलेले हे हिलस्टेशन सातपुडा पर्वतरांगांमधील आहे. सातपुडा पर्वतात पचमढी आणि अमरकटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे. अनेक वर्षांपर्यंत इथे दळणवळणाच्या सुविधांचा अभाव होता; त्यामुळेच कदाचित तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले आहे.तोरणमाळला पोहचताना गाडी डोंगरास वळसा घालून मार्गाक्रमण करते. एक नाही, दोन नाही तब्बल सात फेऱ्या घातल्यानंतर गाडी तोरणमाळला पोहचते. येथे पोहचेपर्यंतचे दृश्य मात्र डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.राज्यातील इतर पर्यटन स्थळांप्रमाणे विकिसत न झाल्याने हे स्थान दुर्लक्षित असले तरी जाणकार पर्यटक आवर्जून तोरणमाळला भेट देणे पसंत करतात. खानदेशच्या जनतेच्या आवडीचे सापुतारा हे स्थळ गुजरात राज्यात येते. पुराणात तोरणमाळचा तूर्णमाळ असाही उल्लेख सापडतो. मुबलक प्रमाणात तोरणाची झाडे असल्याने त्याला तोरणमाळ हे नाव पडले असावे असा तर्क लावण्यात येतो. तोरणमाळ या डोंगरी किल्ल्यापासून खान्देशचा इतिहास सुरू होतो. आज तेथे फक्त या किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्याचे बांधकाम भक्कम असल्याचे ते पुरावे आहेत. मावळत्या सूर्याचे लोभस दर्शन ही एक तोरणमाळची खासियत आहे. ‘मावळताना इथला सूर्य अक्षरश: हसरा असतो,’ असेही इथल्या सूर्यास्ताच्या बाबतीत म्हटले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही. इतर संरक्षित वनांप्रमाणे तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जा देण्यात आला आहे. येथे इतर वन्य प्राण्यांबरोबरच अस्वलांचे प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी वाघही तेथे आढळल्याचे सांगण्यात येते. तोरणमाळ परिसरात नैसिर्गक सौदर्यासोबतच प्राणीसंपदा, औषधी व इतर वनस्पतींनी समृद्ध आहे. परिसरातील स्वर्गीय व कोणत्याही प्रदूषण व मानवी हस्तक्षेपापासून मुक्त निसर्ग आपणास भरभरून आनंद देतो. तोरणमाळ परिसरातल्या जंगलात भटकंती केल्यास आवळा, हिरडा, बेहडा, तुळशी, निलिगरी, बेल, कोरफड यासारख्या वनस्पती दृष्टीत पडतात.नियोजनबद्ध रीतीने या पर्यटनस्थळाचा विकास केल्यास येथे ऐतिहासिक, नैसिर्गक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी पर्यटनाचा आनंद घेता येईल. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने तेथे तोरणमाळ हिल रिसॉर्ट सुरू केले आहे. खान्देशातील एकमेव असलेल्या या अहिराणीच्या हिल स्टेशनला दोन-तीन दिवस मुक्काम करूनही समाधान होत नाही. कडक उन्हातही तलावात पाणी बघून चित्त प्रफुल्लीत होते. जंगलात भटकून झाल्यावर सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस विरंगुळ्यासाठी काठावर येणाऱ्या पर्यटकांशी हा तलाव हृदयाच्या ओलाव्यातून जिव्हाळा निर्माण करतो, यात काही शंकाच नाही. सात पायरीचा घाट : घाट चढून गेल्यावर शेवटच्या उंच टोकावरून रस्त्याकडे पाहिल्यास एका खाली एक सात पायऱ्या दिसतात. हा घाट तोरणमाळ पासून ४ किमी आधी सुरू होतो. सात पायरी घाटाच्या पायथ्याशी काळा पाणी नावाचा पहाड आहे. गंभीर गुन्हे केलेल्या कैद्यांना इंग्रज या पहाडावरून लोटून देत असत. गोरक्षनाथ मंदिर, खडकी पॉइंट, पुरातन किल्ला हे स्थळ, सूर्योदय आणि सूर्यास्थाचे विलोभनीय दृश्य ही तोरणमाळची इतर वैशिष्ट्ये आहेत.इथला पाऊस अनुभवणे हासुद्धा एक अविस्मरणीय अनुभव असतो. खडकी व आमदरी हीसुद्धा विशेष उल्लेखनीय सौंदर्यस्थळे आहेत.तोरणमाळ वरून आगपेटीच्या आकाराच्या झोपड्या व मुंग्यांप्रमाणे माणसांच्या हालचाली दृष्टीस पडतात. तोरणमाळच्या इशान्य भागात सीताखाई पॉइंट आहे. प्रचलित आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र सीतेसोबत या भागातून जात असताना या ठिकाणी रथ अडकून गुफा तयार झाली. भौगोलिकदृष्ट्या ही गुफा पाषाण आणि उंच सुळक्यांनी वेढलेली आहे. सीताखाई धबधब्यातून वाहणारे पाणी पुढे नर्मदेस मिळते. तोरणमाळमधील सीताखाई ही एक गर्द झाडीनी नटलेली अंगावर शहारे आणणारी दरी आहे.तिन्ही बाजूंनी फाटलेला पहाड आणि मध्येच एक उंच सुळका, निसर्गाच्या अचाट शक्तीने साकारलेले एक निसर्गिनर्मित शिल्पच. सीताखाईला लागूनच एक तलाव आहे. त्या तलावाला कमळाच्या वेलींनी आपल्या कुशीत दडवून ठेवलय.यशवंत तलाव तोरणमाळला पोहोचल्यावर दृष्टीस पडतो तो दूरवर पसरलेला निळसर हिरवा रंगाचा यशवंत तलाव. कधीही न आटणाऱ्या या तलावात विहार करण्यासाठी खास स्वयंचिलत बोटींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वर्षातील बाराही महिने पाणी असणाऱ्या तोरणमाळमधील या तलावाची मोहिनी सर्वत्रच घातली आहे. तलावातील पाणी पुढे सिताखाईच्या धबधब्याला जाऊन मिळते.