शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
5
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
6
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
7
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
8
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
9
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
10
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
11
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
12
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
13
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
14
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
15
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
16
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
17
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
18
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
19
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
20
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट

निसर्ग चक्रीवादळाचा जि. प. शाळांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 06:12 IST

संडे अँकर । ठाण्यासह कोकणातील सर्वाधिक समावेश : पुणे-नाशिकच्या शाळांचेही नुकसान

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने राज्यातील १५४० प्राथमिक शाळांना तडाखा बसला असून, त्यांची प्रचंड हानी झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील ३२ शाळांसह रायगड जिल्ह्यातील ९३८, तर रत्नागिरीतील २८९ आणि पुण्यातील २५४ शाळांचा समावेश आहे.यात किनारपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सर्वांत कमी म्हणजे आठ, तर नाशिक जिल्ह्यातील १९ शाळांचीही मोठी पडझड झाली आहे. यामुळे चक्रीवादळग्रस्त विभागास मदत पथकांनी भेट देण्याअगोदर महसूल व वनविभागाने या शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने ९ सप्टेंबर २०२० रोजी पाच कोटी ५३ लाख ११ हजारांची मदत वितरित केली.३ जून रोजी हे निसर्ग चक्रीवादळ धडकण्याआधीच ५० ते ६० किमी अंतरावरून त्याची दिशा बदलल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात त्याचा फारसा तडाखा बसला नसला तरी रायगड आणि रत्नागिरीत अपरिमित हानी झाली.यात मच्छीमारांसह शेती, फळबागा, वृक्षवेली आणि महावितरणच्या वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांच्यापडझडीसह जनावरेही दगावली होती. यात त्या त्या जिल्ह्यातील जि.प.च्या शाळांचेही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे या सुमारे १५४० शाळांच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन महिन्यांनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० कोटींची मदत केली होती. परंतु, ती तोकडी असल्याने महसूल विभागाने गेल्या आठवड्यात मदत दिली.माध्यमिक शाळांच्या दुरुस्तीला मदत नाहीप्रति शाळा दोन लाखांची ही मदत असून, ती फक्त प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठीच आहे. त्यामधून माध्यमिक शाळांसह अशासकीय शाळांची दुरुस्ती करू नये, असे शासनाने बजावले आहे. परंतु, निसर्ग चक्रीवादळाने प्राथमिक आणि माध्यमिक किंवा अशासकीय असा भेदभाव न करता सर्वच शाळांना तडाखा दिला. यामुळे त्यांचे नुकसान कोण भरून काढणार, असा प्रश्न करण्यात येत आहे. शासनाने किमान जि.प.च्या माध्यमिक शाळांच्या दुुरुस्तीसाठी तरी निधी द्यावा, अशी मागणी होत आहे.वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यातून प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचा निधी प्राप्त झाला आहे. यात आणखी काही शाळांसाठी निधी येणार की काय? याबाबत चौकशी करावी लागेल. तसेचमाध्यमिक शाळा या संस्थांच्या असल्यामुळे त्यांच्या पातळीवर ते दुरुस्तीचे काम करून घेतात. आम्ही सर्वांनाच प्रस्ताव द्यायला सांगितले होते.- शेषराव बढे, शिक्षणाधिकारी, जि.प.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळSchoolशाळा