शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गनिर्मित रांजण-खळगे

By admin | Updated: July 2, 2016 03:58 IST

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे निघोज गाव.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे निघोज गाव. या दोघांच्या सीमेवरून कुकडी नावाची नदी वाहत गेलेली आहे. या कुकडी नदीच्या दोनही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. या खडकातच निसर्गाचा अद्भुत आविष्कार आपली वाट पाहत उभा आहे. पृथ्वीतलावर सर्वात श्रेष्ठ शिल्पकार कोण असेल तर तो आहे निसर्ग. कारण या निसर्गाने आपल्या भोवताली इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की, पाहणाऱ्याचे डोळेच दीपून जावेत. निसर्गाकडून तयार झालेल्या साऱ्याच कलाकृती या अवाढव्य आणि डोळे विस्फारणाऱ्या आहेत. आपण सह्याद्रीच्या डोंगररांगांकडे गेलो की, या जास्त ठळकपणे समोर येतात. मग आपलीही बोटे आश्चर्याने तोंडात जातात. मानवाच्या शक्यतेपलीकडच्या या कलाकृती निसर्गाने तयार केलेल्या आहेत. त्या विशेष आयुधांनी. एखाद्या मानवी शिल्पकाराकडे जसे छन्नी, हातोडा अशी साधनसामुग्री असते, तसेच निसर्गाकडे पाणी, हवा, अग्नी अशी पंचमहाभूतांनी भरलेली वेगळी पण वैशिष्ट्यपूर्ण आयुधे आहेत. या आगळ्यावेगळ्या शस्त्रांनी निसर्गाने साऱ्या जगाला हेवा वाटावा अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर अहमदनगरमधील धडकी भरवणारी सुप्रसिद्ध सांधण व्हॅली, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असणारी ‘तैल-बैल’ या जोड डोंगराच्या भिंती, याशिवाय डोंगर-पर्वतांमध्ये तयार झालेल्या सुंदर घळी, कपारी, बुलडाण्यातील लोणार सरोवरसारख्या कैक कलाकृती निसर्गाचे अद्भूत लेणे म्हणून जगप्रसिद्ध आहेत.पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या कुकडी नदीतील निसर्गनिर्मित रांजणखळगे (पॉट होल्स) इतक्या संख्येने आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळणार नाहीत. कुकडी नदीच्या काठावर उभं राहिलं की रांजणखळगे आपल्याला खुणवायला लागतात. डोळे थकून जातील पण मन भरणार नाही, इतके रांजणखळगे येथे निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या आकारांचे, उंचीचे, खोलीचे, कमी जास्त जोडीचे, एकमेकांत मिसळलेले हे रांजणखळगे जणूकाही भूतलावरचं अनोखं शिल्पसमूहच. तसं पाहिलं तर या निर्मितीमागेही एक विज्ञान दडलेलं आहे, असे म्हणतात. नदीने वाहून आणलेले दगड हे या बेसॉल्ट खडकावरील छोट्या भेगांत अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड याच भेगांत जोराने फिरून गोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होत असतात. या प्रक्रियेला काही थोडकी वर्ष नव्हे तर हजारो वर्ष जावी लागतात. हजार वर्षांनंतर या छोट्या भेगा रांजणासारख्या खड्ड्यांचेच रूप घेऊन निर्माण होतात.कुकडी नदीच्या दोन्ही तीरांवर मळगंगा देवीची मंदिरं बांधली आहेत. ही मंदिरेसुद्धा तितकीच देखणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक भक्तांचादेखील वावर असतो. सध्या येथे दोन्ही तीरांना जोडणारा झुलता पूलदेखील बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा पूलदेखील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनला आहे. या पुलावरून रांजणखळगे पाहणे म्हणजे भटकंतीचा उत्कर्षबिंदूच.कुकडी नदीतील या रांजणखळग्याचं महत्त्व ओळखून अनेक पर्यावरणप्रेमींची, विज्ञान अभ्यासकांची पावले इकळे वळत असतात. आपणही भटकंतीला विज्ञानाच्या किमयेची जोड देऊन येथे वाट वाकडी करायला हरकत नाही. कारण नेहमीचीच, सरावाची भटकंतीची ठिकाणे पाहण्यापेक्षा अशी निसर्गाने तयार केलेली व उच्चनिर्मितीमूल्ये असलेली ठिकाणे पाहणे हे केव्हाही ज्ञानात भर घालणारीच असतात.-- ओमकार वर्तले