शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

३० मे रोजी देशव्यापी औषधविक्री ठप्प होणार!

By admin | Updated: May 15, 2017 06:32 IST

देशभर औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीपर्यंत सर्वच बाबतीत गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहारांवर, बेकायदा औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभर औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीपर्यंत सर्वच बाबतीत गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहारांवर, बेकायदा औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर अंकुश लावत, रुग्णांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी अखेर केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. त्यानुसार, औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ई-पोर्टल तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, या पोर्टलला विरोध करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट संघटनेने ३० मे रोजी एक दिवसीय संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.ई-पोर्टलच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असताना, आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट संघटना (एआयओसीडी) व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एमएससीडीए) मात्र याला विरोध केला आहे. या विरोधात २९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे ८ लाख औषधांची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या संपाविषयी संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले की, केंद्राच्या पोर्टलला विरोध आहे, परंतु त्यासह औषधांच्या दुकानातील फार्मासिस्टची अनिर्वायता हटवा, औषध मूल्य नियंत्रण कायद्यामुळे होणारे केमिस्टचे शोषण थांबवा, याही प्रलंबित मागण्या आहेत. संपाविषयी आम्ही केंद्रीय आरोग्यविभाग, पंतप्रधान कार्यालय, गृहविभाग, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कळविले असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.औषधांच्या उत्पादनापासून ते रुग्णांच्या हातात औषध जाईपर्यंतची इत्थंभूत माहिती या ई-पोर्टलवर नोंदवणे, प्रत्येक कंपनीपासून केमिस्टपर्यंत सर्वांना बंधनकारक असणार आहे. कोणतेही औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत. काही महत्त्वाच्या औषधांची शेड्युल एस, शेड्युल एच, शेड्युल एच-वन अशी वर्गवारी तयार करत, या औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी कडक नियम तयार केले आहेत, पण हे नियम धाब्यावर ठेवत, औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीमध्ये गैरव्यवहार केले जात आहेत.हीच परिस्थिती लक्षात घेत, या सर्व गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी केंद्र शासनाने ई-पोर्टलद्वारे औषध उत्पादन, खरेदी-विक्रीवर अकुंश लावण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असून, रुग्णांच्या हितासाठी तर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक आहे. कंपनीने कोणती औषधे बनवली, किती बनवली, यापासून या औषधांचा रुग्णांच्या हातात जाईपर्यंतच्या प्रवासाची सर्व माहिती ई-पोर्टलवर नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे नक्कीच औषधांचा काळाबाजार थांबणार आहे.