राज ठाकरे यांचा घणाघात : मनसेच्या उमेदवाराला अडकविण्यात आल्याचा आरोप
नाशिक : राष्ट्रवादीला सत्तेचा आणि पैशांचा माज चढला असून, त्यांना आता मनसेची भीती वाटू लागल्याने तासगावमध्ये मनसेच्या उमेदवारावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्यात आले आहे. उलट या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रावर कमी बलात्कार केले आहेत काय, असा संतापजनक सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्निवारी नाशिक येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढविला. ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्ष गाडावाच लागेल, असे सांगतानाच नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीने स्वत:हून बिनशर्त पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरणही दिले.
मनसेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होत़े राज यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बलात्कारासंबंधी केलेल्या विधानाचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, निवडून आल्यावर बलात्कार करा, असे गृहमंत्री राहिलेला आर. आर. पाटील सांगतो.
छाती नाही, उंची नाही तरी हा महाराष्ट्राचा गृहमंत्री झाला. याची छाती कोणी मोजली की नाही. तासगावमध्ये आर.आरच्या विरोधात उमेदवारी करणा:या मनसेच्या सुधाकर खाडे यांच्यावर सात वर्षापूर्वी असाच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पुढे तो न्यायालयात निदरेष सुटला.
खोटय़ा केसेस टाकण्याचा आर. आरचा छंद आहे काय? माताभगिनींचा अपमान करणारे विधान आर. आर. पाटील यांनी केले आहे. विनोद जमत नाही तर
करता कशाला? हा कसला गृहमंत्री? असा सवाल त्यांनी केला़ एकजण धरणात मुतू का म्हणतो, शरद पवारांची मुलगी मंत्र्यांच्या गाडय़ा जाळा म्हणते, शरद पवार हे बोटाला लावलेली शाई पुसून टाकत परत मतदान करण्याचे सांगतात. अशी माणसे व त्यांच्या पक्षाला निवडून द्यायचे काय, असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)