शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

पेनूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भीमा आघाडी

By admin | Updated: February 16, 2017 19:08 IST

पेनूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भीमा आघाडी

पेनूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भीमा आघाडीमोहोळ : आॅनलाईन लोकमत सोलापूरजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून, काही ठिकाणचा अपवाद वगळता भीमा परिसर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा दुरंगी सामनाच रंगला आहे.सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समितीच्या निवडणुकीत चुरशीचा असणारा पेनूर जि.प. गट हा राखीव झाला असून, या गटात भीमा परिसर विकास आघाडीने तरुणाला संधी देत तेथे सोमेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सेवानिवृत्त प्राध्यापक शिवाजी सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दलित चळवळीत काम करणारे संजीव खिलारे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अन्य पाच असे आठ उमेदवार रिंगणात उभे आहेत.जरी आठ उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरा सामना भीमा परिसर विकास आघाडीचे उमेदवार सोमेश क्षीरसागर व राष्ट्रवादीचे शिवाजी सोनवणे यांच्यातच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पेनूर जि.प. गटात पेनूर गण व टाकळी सिकंदर असे दोन गण आहेत. गटात एकूण ११ गावे आहेत तर ३० हजार १४ मतदार आहेत. या जि.प. गटात पेनूर, पाटकूल, आढेगाव, तांबोळे, नजीकपिंपरी, टाकळी, वरकुटे, अंकोली, सौंदणे, औंढी, शेजबाभूळगाव आदी ११ गावांचा समावेश आहे.भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून गत पंचवार्षिक व चालू निवडणुकीत भीमा सह. साखर कारखान्याची एकहाती सत्ता आणण्यात महाडिक यांना यश आले आहे. गत जि.प. निवडणुकीत हा गट आघाडीच्याच ताब्यात होता. या गटात आघाडीच्या माध्यमातून शिवसेनाही महाडिक यांच्याबरोबर आहे. शिवाय राष्ट्रवादीच्याच एका गटाचे नेते राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे आघाडीसोबत आहेत. तर दुसरीकडे गेली २० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजन पाटील यांनी आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यात केलेली कामे सहकाराच्या माध्यमातून दूध संघ सोसायट्याच्या माध्यमातून केलेले काम व लोकनेते बाबुराव आण्णांना मानणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता याच्या जीवावर राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वजण एक झाले असतानाही या सर्वांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते कामाला लागले आहेत.भाजपाचा लढा४तर दुसरीकडे महाआघाडीसोबत सूत न जुळल्याने ऐनवेळी भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले त्यामध्ये पेनूर गटात भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष संजीव खिलारे यांना उमेदवारी देऊन भीमा परिसर आघाडी व राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. या भागात भाजपाची ताकद जरी कमी असली तरी भाजपाला मिळालेला उमेदवार पाहता भाजपाही कासव गतीने मैदानात उतरली आहे. याशिवाय काँग्रेसमधून दत्तात्तय घोडके अपक्ष म्हणून दादाराव पवार, रासपमधून अतुल मोरे, भारिप बहुजन मधून प्रकाश सोनटक्के तर बसपातून प्रेमनाथ सोनवणे असे आठ उमेदवार उभे आहेत, परंतु खरी लढत भीमा परिसर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार आहे.