शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘नॅशनल पार्क’ला जागतिक दर्जा देऊ’

By admin | Updated: November 17, 2014 04:03 IST

मुनगंटीवार यांनी बोरीवलीतील नॅशनल पार्कचा पाहणी दौरा केला, या वेळी त्यांनी नॅशनल पार्कच्या जागेवरील अतिक्रमण व नागरिकांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला.

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात वसलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (नॅशनल पार्क) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार असून, येत्या अर्थसंकल्पात वनविकासासाठी प्रभावी योजना प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार यांनी बोरीवलीतील नॅशनल पार्कचा पाहणी दौरा केला, या वेळी त्यांनी नॅशनल पार्कच्या जागेवरील अतिक्रमण व नागरिकांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. लोकांना जसा जगण्याचा अधिकार आहे तसा वन्यप्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. हे लक्षात घेऊन परस्पर पूरक पद्धतीने वनांचा विकास करण्याचे काम केले जाईल, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दरदिवशी देशातील ४० टक्के पर्यटकांचे आगमन होते. त्यातील ३२ टक्के पर्यटक केवळ २४ तासांत देशातील विविध राज्यांमध्ये पर्यटनासाठी जातात. त्यांनी मुंबईत थांबून पर्यटनाचा आनंद घ्यावा, अशी स्थळे विकसित करण्याचे आव्हानात्मक काम आपण हाती घेतले आहे. महानगरांलगत असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची संख्या मुळातच खूप कमी आहे. त्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे घनदाट जंगल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास त्याचा राज्याच्या उत्पन्नात फायदा होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. या वेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘बटर फ्लाइंग इन संजय गांधी नॅशनल पार्क’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.(प्रतिनिधी)