शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅशनल अ‍ॅनिमेशन अ‍ॅन्ड गेमिंग इन्स्टिट्यूट उभारणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 01:21 IST

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘नॅशनल अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड गेमिंग इन्स्टिट्यूट’ची उभारणी करणार असून, त्याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत. त्यासाठी चित्रपटनगरीमध्ये जागा

मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘नॅशनल अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड गेमिंग इन्स्टिट्यूट’ची उभारणी करणार असून, त्याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत. त्यासाठी चित्रपटनगरीमध्ये जागा देण्याची तयारी राज्य सरकारने केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.१४व्या मुंबई आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी झाले. मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईची ओळख ही देशाच्या आर्थिक राजधानीबरोबरच ‘एंटरटेन्मेंट कॅपिटल’ अशी झाली आहे. लघुपट हे माहितीप्रधान असतात व त्याचा परिणाम सर्वदूर होत असतो. त्यामुळे जीवनातील विविधतेचा प्रत्यय येतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड म्हणाले, की लघुपट व माहितीपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून, त्यांचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. दूरदर्शनच्या वाहिनीवर लघुपट व माहितीपटांचे प्रसारण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने ‘डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ माहितीपट निर्माते नरेश बेदी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नरेश बेदी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल व महोत्सवाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर जॅकी श्रॉफ यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी महोत्सवाचे संचालक मुकेश शर्मा, माईक पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)