शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
4
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
5
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
6
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
7
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
8
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
11
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
12
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
13
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
14
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
15
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
16
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
17
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
18
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
19
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
20
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

नाशिकची सायकल वारी पंढरीत

By admin | Updated: July 11, 2016 05:52 IST

नाशिकहून निघालेली सायकल दिंडी ३६५ किलोमीटरचे अंतर पार करून पंढरीत पोहोचली. या दिंडीचे हे सलग पाचवे वर्ष असून ‘नाशिकची सायकल वारी, लयभारी’, ’सायकल चालवा, इंधन व पर्यावरण वाचवा

विठ्ठल कवडे,  पंढरपूरनाशिकहून निघालेली सायकल दिंडी ३६५ किलोमीटरचे अंतर पार करून पंढरीत पोहोचली. या दिंडीचे हे सलग पाचवे वर्ष असून ‘नाशिकची सायकल वारी, लयभारी’, ’सायकल चालवा, इंधन व पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत ही वारी निघाली होती.नाशिक लगतच्या परभणी, नांदेड या जिल्ह्यातील ९ वर्षांपासून ते ७३ वर्षांपर्यंतची लहान मुले, महिला व पुरुष वारकरी या सायकल दिंडीत सहभागी झाले आहेत. ४० डॉक्टर, तीन एसीपी, एक कमिशनर यांच्यासह वकील, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, नगरसेवक यांच्यासह अनेक वारकरी या सायकल दिंडीत सहभागी झाले आहेत.पाच वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हरीश बैजल यांनी अवघ्या ४८ मित्रांच्या सहकार्याने ही सायकल दिंडी सुरू केली. यंदा तर, ४०० हून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. शनिवारी रात्री टेंभुर्णी येथे मुक्काम करून रविवारी दुपारी १च्या सुमारास पंढरीत पोहोचली. वारकऱ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी त्यांचा या सायकल दिंडीच्या माध्यमातून प्रयत्न आहे. माळशिरस तालुक्यात संतांच्या पालख्यांचे आगमनश्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमवेत संत सोपानकाका, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी) यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्यात आगमन झाले. या पालखी सोहळ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.पंढरपूरच्या भाविकांसाठी वऱ्हाडात एसटीची खास व्यवस्थाबुलडाणा : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वऱ्हाडातून विशेष सेवा उपलब्ध केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २९ गाड्या वाढवत यावर्षी २५0 बसेस सोडण्यात येणार आहेत.पश्चिम वऱ्हाडातील भाविकांना पंढरपूरला जाणे सोईचे व्हावे यासाठी महामंडळाच्यावतीने बुलडाणा व अकोला विभागातून २५० एसटीबस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातून एकूण १०० गाड्या तर, अकोला विभागातून १५० गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबरोबरच ज्या गावातून किमान ५० भाविक पंढरपूरला जाण्यासाठी तयार असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र बस त्या गावातून सोडण्यात येणार आहे. गतवर्षी ७० हजार भाविकांना लाभबुलडाणा व अकोला विभागातून गतवर्षी पंढरपूर यात्रेकरीता २२१ बसद्वारे ९६४ फेऱ्या झाल्या होत्या. त्याद्वारे ७० हजार २५३ भाविकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत १ कोटी ९ लाख ६ हजार ८५२ रुपये उत्पन्नाची भर पडली होती.