शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर दरोड्याचा अवघ्या बारा तासांत पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:28 IST

नाशिक : लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर शिवारातील मरळगोई रस्त्यावरील दरेकर वस्तीवर शनिवारी (दि़२६) मध्यरात्री टाकलेल्या दरोड्यातील दोन दरोडेखोरांना अवघ्या १२ तासांत ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे़ राहुल खंडू टावरे (राग़जानन हौसिंग सोसायटी, खंडोबामाळ, भोसरी, पुणे) व अंकुश सुभाष लोळगे (रा़साईनाथ हॉस्पिटल, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, उर्वरित ...

ठळक मुद्देमरळगोई दरोडा : पुण्यातील दोघा संशयितांना अटक

नाशिक : लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर शिवारातील मरळगोई रस्त्यावरील दरेकर वस्तीवर शनिवारी (दि़२६) मध्यरात्री टाकलेल्या दरोड्यातील दोन दरोडेखोरांना अवघ्या १२ तासांत ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे़ राहुल खंडू टावरे (राग़जानन हौसिंग सोसायटी, खंडोबामाळ, भोसरी, पुणे) व अंकुश सुभाष लोळगे (रा़साईनाथ हॉस्पिटल, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, उर्वरित चौघा फरार संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली़मरळगोई येथील रत्नाकर दरेकर यांच्या वस्तीवर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पाच-सहा दरोडेखोरांनी चाकू, कोयता, लाकडी दांडे, लोखंडी टामीच्या साहाय्याने किचनचा दरवाजा उचकावून घरात प्रवेश केला़ यानंतर दरेकर व त्यांच्या कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़या दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व कर्मचारी यांनी आरोपींचा शोध सुरू केला़ दरोडेखोरांची संख्या लक्षात घेता त्यांनी नक्कीच वाहनाचा वापर केला असल्याचे अनुमान काढून परिसरातील ढाबे, पेट्रोलपंप यांची तपासणी सुरू केली़ त्यांना विंचूर-येवला रोडवरील हॉटेल अपनाजवळ सफेद रंगाची तवेरा वाहन (एमएच १४ बीए ६१०९) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळून आले़सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी वाहनातील राहुल टावरे व अंकुश लोळगे यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्यामुळे या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दरोड्याची कबुली देत चौघे साथीदार ऐवज घेऊन पळाल्याचे सांगितले़ पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीची तवेरा जप्त केली आहे़ दरोड्याचा अवघ्या बारा तासांत यशस्वी तपास करणारे सोनवणे यांच्यासह लासलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना दहा हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर करण्यात आले आहे़ 

लासलगाव पोलीस ठाण्यातील जनार्दन सोनवणे व गुन्हे शाखेने यांनी दरोड्याचा अवघ्या बारा तासांत यशस्वी तपास केला आहे़ यातील चौघे फरार संशयितांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, अहमदनगर जिल्ह्यांतील शेवगाव व भोसरी येथील दोघांचा समावेश असून, त्यांच्या तपासासाठी पोलीस पथक पाठविण्यात आले आहे़- संजय दराडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक