शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चाकूहल्ला करून लुटणा-या अल्पवयीन गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:50 IST

नाशिक : रात्रीच्या सुमारास एकट्या व्यक्तीला गाठून त्याच्यावर चाकूने वार करून लूटल्यानंतर अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून पळ काढणा-या तिघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी (दि़०१) रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले़ शहरातील सहा जणांना विविध ठिकाणी चाकूने वार करून लुटल्याची कबुली या तिघांनी पोलिसांकडे दिली आहे़शहरातील नाशिकरोड, उपनगर, मुंबईनाका, द्वारका, शरणपूररोड, पाथर्डी फाटा या ठिकाणी ...

ठळक मुद्देरात्रीच्या सुमारास एकट्या व्यक्तीला गाठून त्याच्यावर चाकूने वार तिघा अल्पवयीन संशयित ताब्यात ; सहा गुन्ह्यांची कबुली

नाशिक : रात्रीच्या सुमारास एकट्या व्यक्तीला गाठून त्याच्यावर चाकूने वार करून लूटल्यानंतर अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून पळ काढणा-या तिघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी (दि़०१) रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले़ शहरातील सहा जणांना विविध ठिकाणी चाकूने वार करून लुटल्याची कबुली या तिघांनी पोलिसांकडे दिली आहे़शहरातील नाशिकरोड, उपनगर, मुंबईनाका, द्वारका, शरणपूररोड, पाथर्डी फाटा या ठिकाणी चाकूहल्ला करून लुटल्याच्या घटना घडल्या होत्या़ पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी हल्ला करून लूटण्याची पद्धत व दुचाकी यावरून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन्ही परिमंडळातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचा-यांना या टोळीचा शोध घेण्यास सांगितले होते़ सातपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी एस. आर. साळवे यांना या तिघांबाबत माहिती मिळाली होती़गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिका-यांनी शुक्रवारी (दि़०१) मध्यरात्री सापळा रचून अ‍ॅक्टिवा (एमएच १५ ईटी २६५२) दुचाकीवरील तिघा अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले़ पोलिसांनी या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चांदीची चैन, चाकू, दुचाकी, रोख रक्कम असा सुमारे ६० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल आढळून आला़ त्यामुळे या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांची शहरात केलेल्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली़ चेहडी शिवारातील निसर्ग लॉन्स येथे २५ नोव्हेंबरला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टीवा दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी ज्ञानेश्वर कुमावत (१९, रा. चेहडी पपींग रोड) या युवकावर वार करून रोकड, चांदीचे चेन असा ऐवज लूटून नेला होता़या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याच दिवशी शहरातील विविध ठिकाणी याच पद्धतीने लुटीच्या घटना घडल्या होत्या़ दरम्यान, या तिन्ही अल्पवयीन संशयितांना नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी काही लूटीच्या घटना समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़