शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:53 IST

नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवगडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, नाशिक) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते़शरणपूर रोडवरील बाफणा ...

ठळक मुद्देजिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव बाफणा ज्वेलर्स येथे सुरक्षारक्षकाचे काम स्वॅबचा पॉझिटीव्ह अहवाल

नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवगडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, नाशिक) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते़शरणपूर रोडवरील बाफणा ज्वेलर्स येथे सुरक्षारक्षकाचे काम करीत असलेले रेवगडे यांना आठ दिवसांपासून त्रास जाणवत होता़ त्यांनी यासाठी खासगी रुग्णालयात उपचारही घेतले, मात्र त्रास वाढल्याने त्यांना शुक्रवारी (दि़८) जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत चार रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे़ यापैकी दोन महिला व एक पुरुषाचा अहवाल निगेटीव्ह आला असून, आज दाखल झालेल्या महिलेचा अहवाल येणे बाकी आहे़ भाऊसाहेब रेवगडे यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.