शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यापासून राज्यात शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी ; पर्यावरणमंत्री रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:39 IST

नाशिक : राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून शंभर टक्के प्लॅस्टिकला बंदी केली जाणार असून, प्लॅस्टिकमुक्त होणा-या ग्रामपंचायतींना पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. नगरपालिका आणि महापालिकांसाठीदेखील बक्षीस योजना राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात होणाºया कायद्यात प्लॅस्टिक निर्मिती आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी असून, या बंदीचा प्लॅस्टिक उद्योगावर ...

ठळक मुद्दे प्लॅस्टिकमुक्त ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीसनगरपालिका आणि महापालिकांसाठीदेखील बक्षीस योजना प्लॅस्टिक उद्योगावर परिणाम होणार नसल्याचा दावा

नाशिक : राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून शंभर टक्के प्लॅस्टिकला बंदी केली जाणार असून, प्लॅस्टिकमुक्त होणा-या ग्रामपंचायतींना पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. नगरपालिका आणि महापालिकांसाठीदेखील बक्षीस योजना राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात होणाºया कायद्यात प्लॅस्टिक निर्मिती आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी असून, या बंदीचा प्लॅस्टिक उद्योगावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही रामदास कदम यांनी केला.

नाशिकरोड येथील जलविज्ञान संशोधन प्रबोधिनी येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि पर्यावरण विभागाचे सचिव सतीश गवई यांच्या उपस्थितीत प्लॅस्टिकबंदी धोरण राबविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी येत्या काही महिन्यांत संपूर्ण राज्यात सर्वप्रकारच्या प्लॅस्टिकला बंदी केली जाईल, असे सांगितले.देशातील १७ राज्यांमध्ये प्लॅस्टिकला पूर्णपणे बंदी असून, महाराष्टÑातही प्लॅस्टिकबंदीचा कायदा प्रभावीपणे राबविला जाऊ शकतो. किंबहुना ही काळाची गरज असून, पर्यावरणासाठी सर्वांनीच संवेदनशीलता दाखविण्याची आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.गुढीपाडव्याच्या अगोदर होणाºया अधिवेशनात प्लॅस्टिकबंदीचा कायदा संमत केला जाईल. तत्पूर्वी याबाबतच्या सूचना जाणून घेण्यासाठी राज्यात विभागनिहाय नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. कदम म्हणाले, प्लॅस्टिकमुक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागनिहाय ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकांनादेखील बक्षीस योजनेत आणले जाणार आहे. यासाठीची तरतूद पर्यावरण विभागाकडून केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.प्लॅस्टिक उद्योगासाठी लागणारा कच्चामाल हा ९० टक्के इतर राज्यातून आणला जातो. त्यामुळे येथील उद्योगावर प्लॅस्टिक बंदीचा फारसा परिणाम होणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.कचºयाच्या प्रदूषणावर नाशिक महापालिका चांगले काम करीत आहे. त्याचा अभ्यास इतर महापालिका करून कचºयावर प्रक्रिया केली पाहिजे. कचरा डेपोसाठी पर्यायी जागांची गरज लागू नये यासाठीच कचºयावर प्रक्रिया केली पाहिजे. गोदावरी नदीपात्रात एकही थेंब ड्रेनेज पाण्याचा जायला नको, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी राज्याचे अतिरिक्त मुख्य पर्यावरण सचिव सतीश गवई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव अनबलगन, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन उपस्थित होते.