शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

शर्टवरील टेलर मार्कवरून खुनाचा उलगडा़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:19 IST

नाशिक : सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दातली शिवारात सहा महिन्यांपूर्वी डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या शर्टवर असलेल्या टेलरच्या मार्कवरून खुनाचा उलगडा करण्यात यश आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ खून करण्यात आलेला इसम हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी बालाजी ...

ठळक मुद्देग्रामीण पोलिसांची कामगिरीउस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इसमाचा खूनपत्नी मंदाकिनी तिचा प्रियकर भागचंद भागरेचा अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली

नाशिक : सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दातली शिवारात सहा महिन्यांपूर्वी डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या शर्टवर असलेल्या टेलरच्या मार्कवरून खुनाचा उलगडा करण्यात यश आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ खून करण्यात आलेला इसम हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी बालाजी पंढरी बनसोडे असून, अनैतिक संबंधातून त्याची पत्नी मंदाकिनी बनसोडे तिचा प्रियकर भागचंद रामविलास भागरेचा याने केल्याचे समोर आले असून, या दोघांनाही अटक करण्यात आली आहे़दातली शिवारातील गट नंबर ५६९ मधील कोरड्या शेततळ्यामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह २४ फेब्रुवारी २०१७ रोजी आढळून आला़ या इसमाच्या डोक्यावर, कपाळावर तसेच गळ्यावर गंभीर दुखापत असल्याने प्रथम अकस्मात मृत्यू व शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ जिल्ह्यातील अनोळखी मृतदेह व खुनाच्या घटनेचा तपास करण्यासाठी अधीक्षक दराडे यांनी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस अधिकारी व चार पोलीस कर्मचाºयांचे विशेष पथक तयार केले असून, त्यांच्याकडे या खुनाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली होती़ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक ए. ए. गडाख, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाजारे, पोलीस हवालदार इंगळे, पोलीस नाईक केदारे, पोलीस शिपाई गावले यांनी मृतदेहाच्या अंगातील शर्टवर असलेला ‘दीपक टेलर्स, कळंब’ हा मार्क व धाग्यातील दोरा यावरून तपास सुरू केला़ या टेलरकडे जाऊन त्याच्याकडील रजिस्टरची तपासणी केली असता बालाजी वानखेडे नावाचे दोन इसम असल्याचे आढळून आले़पोलिसांनी नामसाधर्म्य असलेल्या वानखेडे नावाच्या दोघांचा शोध घेतल्यानंतर मंगरूळ गावात गोपनीयरीत्या दोन-तीन दिवस राहून माहिती घेतली़ त्यांना बालाजी वानखेडे हा गत सहा महिन्यांपासून बेपत्ता असून, त्याच्या पत्नीने हरविल्याची साधी तक्रारही दाखल केली नसल्याचे तसेच त्याची पत्नी मंदाकिनी व गावातील भागचंद भागरेचा यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पती बालाजी वानखेडे हा संशयित भागरेचा यास ब्लॅकमेल करीत असे तसेच स्वत:च्या मुलीवरही त्याने शारीरिक अत्याचार केले़गावात झालेल्या भांडणामध्ये बालाजीला मारहाण करणाºयांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तो दीड महिन्यापासून गावातून निघून नाशिकला आला होता़ भागरेचा याने आपल्याला मदत केली नाही म्हणून बालाजी त्यास नेहमी शिवीगाळ करीत असे़ त्यातच बालाजी याने भागरेचा यास २२ फेब्रुवारी २०१७ रोजी नाशिक येथे घेण्यास बोलविले असता तो इंडिका घेऊन आला़ बालाजी यास कारमधून घेऊन जात असताना सिन्नरच्या पुढे गेल्यानंतर भागरेचा याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला असता बालाजीने त्याच्या हाताला चावा घेतला़यामुळे संतप्त झालेल्या भागरेचा याने बालाजी वानखेडेच्या डोक्यात दगड टाकून जिवे ठार मारले व शेतातील बांधावरून त्यास शेततळ्यात फेकून दिले़ संशयित भागरेचा व मंदाकिनी यांनी अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली दिली आहे़दरम्यान, या खुनाचा यशस्वी तपास करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक दराडे यांनी अभिनंदन करून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे़