शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

'बोटॅनिकल गार्डन' वाढविणार नाशिकचे वैभव

By admin | Updated: December 27, 2016 18:10 IST

पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान शहराचे आगळे निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले

अझहर शेख/आॅनलाइन लोकमतनाशिक, दि. 27 - आॅक्सिजन हब म्हणून ओळखले जाणारे पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान शहराचे आगळे निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. पहिल्यापासूनच नाशिककरांच्या पसंतीस खरे उतरलेले या वनोद्यानाचे रुपडे आता पालटले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उद्यानात बोटॅनिकल गार्डनची संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत उद्यानात विविध विकासकामे करण्यात आली असून पर्यावरणाचे महत्त्व भावी पिढीला लक्षात यावे आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवडीचा संदेश देणारे आगळे कथानक असलेला लाईट-शो हे मुख्य या उद्यानामधील मुख्य आकर्षण ठरणार आहे. नाशिक महापालिका, वनविकास महामंडळ यांच्या साहाय्याने टाटा ट्रस्ट या खासगी प्रायोजकामार्फत ठाकरे यांनी बोटॅनिकल गार्डनची संकल्पना अंमलात आणली आहे. या संकल्पनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून याचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि.२७) शनिवारी अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.झाडे बोलणार माणसांशी...सर्वांपेक्षा जास्त बुद्धी सृष्टीमातेने मनुष्याला दिली आणि मनुष्याने काय केले तर ती बुद्धी गहाण ठेवून थेट सृष्टीवरच क्रूर हल्ला चढविला, तो कशासाठी तर स्वार्थासाठी...सृष्टीचा समतोल टिकला नाही तर सर्वनाश अटळ आहे...जागे व्हा, उठा... अजूनही वेळ गेलेली नाही, वाईट स्वप्न समजून विसरून जाऊ या...सृष्टीमातेचा करपलेला हिरवा पदर पुन्हा हिरवा क रुया... असा संवाद कोणी नेता, पर्यावरणवादी, सामाजि र्यकर्ता मानवाशी साधत नसून चक्क बॉटनिकल गार्डनमधील झाडेच माणसांशी साधत आहे. नेहरू वनोद्यानातील कृत्रिम झाडेच सृष्टीच्या अस्तित्वासाठी मनुष्यप्राण्याला साद घालत आहे. त्यांचा हा संवादाचा ह्यलाईट-शोह्ण मने जिंकणारा तर आहेच परंतू वृक्षप्रेम वाढविणाराही आहे.आवरावा सिमेंट-काँक्रिटचा मोहसिमेंट-काँक्रिटच्या जंगलनिर्मितीचा मानवाने मोह सोडावा आणि भावी पिढीला समृद्ध पृथ्वी सोपविण्याकरिता वृक्षसंपदेचे संवर्धन करावे, या उद्देशाने  बोटॅनिकल गार्डनची संकल्पना राबविण्यात आली आहे. उद्यानातील हा लाईट-शो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात आणून देणारा ठरणारा आहे. यामुळे वनोद्यानात असलेल्या सर्वच भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. 20 मिनिटांचा हा कार्यक्रम निसर्गाविषयीचे सकारात्मक विचार वाढविण्यास पूरक ठरणारा आहे. ...आमचे जगणे तुमच्यासाठीआम्हाला जगवा कारण ते तुमच्यासाठी आणि या सृष्टीच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. क्रूरता सोडा आणि माणुसकीच्या भावना जाग्या ठेवा, आमच्यावर कुऱ्हाड चालवू नका. प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं आणि विनाशानं विनाश. त्याचा शेवट होतो तो सर्वनाशानं, असा संदेश येथील तीन कृत्रिम झाडांचे कुटुंब अस्सल झाडांच्या सान्निध्यातून देतात. तीन कृत्रिम झाडे व त्यांच्यामध्ये आजोबा, आई, मुलाचे दाखविण्यात आलेली नाती आणि मानवाकडून जेव्हा कोळसा व लाकडच्या हव्यासापोटी सर्वांत मोठे झाड म्हणून आजोबावर चालविली जाणारी कुऱ्हाड...अशा कथेमधून जंगल संवर्धनाचा संदेश देण्यात आलेला आहे.