शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या भाजप उमेदवारीबाबत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 18:13 IST

नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबतचा पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी (दि़२६)चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि़२७) सकाळी अधिकृत उमेदवार घोषीत करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदाररावसाहेब दानवे यांनी सांगून राणेंविषयी योग्यवेळी ...

ठळक मुद्दे पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच उमेदवारी ; खा.रावसाहेब दानवे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अंतिम मुदत

नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबतचा पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी (दि़२६)चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि़२७) सकाळी अधिकृत उमेदवार घोषीत करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदाररावसाहेब दानवे यांनी सांगून राणेंविषयी योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने राणेंना भाजपाकडून मिळणा-या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे़विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि़२७) अंतिम मुदत आहे़ त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्षाची स्थापना करून भाजपात प्रवेश करणारे नारायण राणे यांना भाजपा उमेदवारी देणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे़ पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेले खा़रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी भाजपा ही निवडणूक स्वतंत्ररित्या लढवित असून त्यामध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार आहे़ राणे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यामुळे त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही़भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेसाठी शायना एऩसी़, माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्यासह अन्यचार जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे़ या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री चर्चा करून त्यांची यादी केंद्रीय प्रदेश कार्यकारीणीला कळविण्यात येईल़ यानंतर केंद्राने मान्यता दिलेल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा सोमवारी (दि़२७) केजी जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले़ यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, केशव उपाध्ये, सुनील बागूल, सुहास फरांदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़