शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावरील कर्मचारी महिलेकडील चार लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 17:16 IST

नाशिक : राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या महिला कर्मचाºयास राणेनगर येथील समांतर रस्त्यावर चारचाकीने धडक देऊन खाली पाडून तिच्याकडील चार लाख रुपयांची बॅग लुटल्याची घटना सोमवारी (दि़९) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली़ महामार्गावरील समांतर रस्त्यांवर भरदिवसा होत असलेल्या लूटमारीच्या घटनांमुळे नागरिक ...

ठळक मुद्दे राणेनगर येथील समांतर रस्ता चारचाकीने धडक देऊन खाली पाडले चार लाख रुपयांची बॅग लुटली़

नाशिक : राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या महिला कर्मचाºयास राणेनगर येथील समांतर रस्त्यावर चारचाकीने धडक देऊन खाली पाडून तिच्याकडील चार लाख रुपयांची बॅग लुटल्याची घटना सोमवारी (दि़९) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली़ महामार्गावरील समांतर रस्त्यांवर भरदिवसा होत असलेल्या लूटमारीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत़

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर नीलिमा शिंदे या कामास आहेत़ सोमवारी अकरा वाजेच्या सुमारास नेहेमीप्रमाणे पाथर्डी फाट्यावरील अ‍ॅक्सिस बँकेत पेट्रोलपंपावरील जमा रक्कम भरण्यासाठी आपल्या लाल रंगाच्या अ‍ॅक्टिवाने (एमएच १५, डीपी ८३२२) जात होत्या़ शिंदे या पेट्रोलपंपापासून शंभर-दिडशे मीटर अंतरावर जात नाही तोच त्यांच्या दुचाकीला पांढºया रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक देऊन त्यांना खाली पाडले़

शिंदे यांना चारचाकीने धडक दिल्यानंतर त्या खाली पडल्या असता चारचाकीमधील संशयितांनी उचलण्याचे नाटक करीत त्यांच्याजवळील तीन लाख ७६ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन फरार झाले़ या घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळविताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, उपनिरीक्षक सुनील बोडके हे घटनास्थळी दाखल झाले होते़

दरम्यान, या लूट प्रकरणातील चारचाकी वाहनाचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत़ दरम्यान या लुटीबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़एकामागोमाग अनेक लूटमारीच्या घटना

गत महिनाभरात जॉगिंग ट्रॅकलगत तिघा चोरट्यांनी एकास मारहाण करून लुटल्याची घटना घडली़ त्यानंतर पेठेनगर कॉर्नरवर रात्री एक वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी येणाºया कामगाराला अडवून तिघांनी मारहाण करीत मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला़ मात्र, संबंधित कामगाराने आरडा-ओरड केल्याने नागरिक मदतीला आले व संशयितांनी पळ काढला़ विशेष म्हणजे एकामागोमाग अनेक घटना घडूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही़