शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची कामगिरी कौतुकास्पद : मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 19:51 IST

नाशिक : १९८८ साली १४५ संलग्न वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत आजमितीस ३४६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत़ विद्यापीठाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून काळानुरूप विद्यापिठाने केलेले डिजीटलायझेशन हे कौतुकास्पद आहे़ या विद्यापठास लाभलेले कुलगूरू डॉ़ दिलीप म्हैसेकर व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे विद्यापीठाची ही प्रगती असल्याचे गौरवोद्गार प्रमुख अतिथी तथा नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मेहता यांनी केले़ विद्यापीठाचा विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रविवारी (दि़१०) त्या बोलत होत्या़

ठळक मुद्दे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ२० वा वर्धापनदिन सोहळाजीवनगौरव पुरस्कार प्रदान

नाशिक : १९८८ साली १४५ संलग्न वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत आजमितीस ३४६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत़ विद्यापीठाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून काळानुरूप विद्यापिठाने केलेले डिजीटलायझेशन हे कौतुकास्पद आहे़ या विद्यापठास लाभलेले कुलगूरू डॉ़ दिलीप म्हैसेकर व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे विद्यापीठाची ही प्रगती असल्याचे गौरवोद्गार प्रमुख अतिथी तथा नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मेहता यांनी केले़ विद्यापीठाचा विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रविवारी (दि़१०) त्या बोलत होत्या़

सद्यस्थितीत डॉक्टर व रुग्ण यांच्यामध्ये संवाद होत नसल्याने वादाचे प्रसंग निर्माण होतात़ आयसीयू तसेच आॅपरेशन थिएटरयामध्ये सर्रास मोबाईलमध्ये सुरू असतात़ यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणा-या विद्यार्थ्यांना वैद्यकिय व्यवसायाचे नीतीमूल्ये शिकविण्याची गरज असल्याचे डॉ़ मेहता सांगितले़ सचिव संजय देशमुख यांनी विद्यापीठाच्या वीस वर्षांचा यशस्वी टप्प्याबाबत अभिनंदन करून जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयस मान्यता मिळाल्याने शंभर जागा वाढल्याचे तसेच भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेमुळे २५० शिक्षकांची नेमणूका करण्यात आल्या आहेत़ यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा वाढणार असल्याचे सांगितले़ कुलगुरू डॉ़ दिलीप म्हैसेकर यांनी महाराष्ट्रातील आरोग्यसेवा व आरोग्य शिक्षणात भरीव योगदान देणा-या सर्व विद्याशाखांच्या व्यक्तींच्या जीवनकार्याबाबत मराठी भाषेत शिल्पकार चरित्रकोषचे काम पुर्ण झाले असून त्याचे लवकरच मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद््घाटन होणार असल्याचे सांगितले़

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय विद्याशाखेतील डॉ़ अशोक अनंत महाशूर, डॉ़ सय्यद अब्दुस सामी, डॉ़ विलास दत्तोपंत वांगीकर, आयुर्वेद विद्याशाखेतील डॉ़ अनंत भगवंत धर्माधिकारी, डॉ़ गांधीदास सोनाजीराव लवेकर, डॉ़ पांडुरंग हरी कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला़ तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या आरोग्य विद्याशाखेनिहाय विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या ४० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेचे सात विद्यार्थी, दंत विद्याशाखेचे तीन विद्यार्थी, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे ११, होमिओपॅथी विद्याशाखेचे चार विद्यार्थी आणि तत्सम विद्याशाखेच्या १५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

आरोग्य विद्यापीठाने विसाव्या वर्धापन दिनापासून सुरू केलेल्या ई-पेमेंट गेटवे या आॅनलाईन शुल्कप्रणालीचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख यांच्या उद्घाटन करण्यात आले़ यावेळी व्यासपीठावर आयुष संचालनालय मुंबईचे संचालक कुलदीप राज कोहली, विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉ़मोहन खामगांवकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयचे संचालक डॉ़प्रविण शिनगारे, कुलसचिव डॉक़ालिदास चव्हाण उपस्थित होते़सुवर्णपदक प्राप्त वैद्यकीय विद्यार्थीपदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या आरोग्य विद्याशाखानिहाय विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य (सुवर्णपदक) मिळविणाºया ४० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके जाहीर करण्यात आली होती़ यापैकी उपस्थित वीस विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सत्कार करण्यात आला़ यामध्ये सायन मुखर्जी - बायोकेमिस्ट्री (ग्रँट गर्व्हमेंट मेडीकल कॉलेज मुंबई), बन्सल वरूण विवेक - ह्यूमन अ‍ॅनाटोमी (सेठ जी़एस़ मेडीकल कॉलेज, मुंबई), शांभवी चौधरी - पॅथालॉजी (महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, वर्धा), गद्दाम रुता चंद्रकांत - फॉरेन्सिक मेडिसीन अ‍ॅण्ड टॉक्सीकोलॉजी (अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, सोलापूर), नाईक अश्विनी नागेश -एमबीबीएस पार्ट -१ (गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज, मिरज), जांद्याला आनंद शंकर - आॅप्थेमोलॉजी (आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे), हाकिम युसूफ शेखादम - इएनटी (पीव्हीव्हीपीएफ अहमदनगर हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेज, अहमदनगर), पापडेजा वैष्णवी बिणेश - संस्कृत (एसएसटी आयुर्वेद कॉलेज, संगमनेर), पोकारणेकर प्रज्ञा धनाजी - संस्कृत (जे़जे़मग्दुम आयुर्वेद कॉलेज, कोल्हापूर), नाडर अर्थी स्टेनली - बीएमएमएस पार्ट -१ (आऱए़पोदार आयुर्वेद कॉलेज, मुंबई), वाघ प्रेरणा प्रकाश - बीएमएमएस पार्ट -१ व २ (ए़एस़संघ आयुर्वेद कॉलेज,नाशिक), कोकरे अभिषेक दिलीप - बीएमएमएस पार्ट -१ व २ (जे़जे़मग्दुम आयुर्वेद कॉलेज, कोल्हापूर), सईद शहीफा शकील - बीयुएमएस (मोहम्मदिया युनानी कॉलेज, मालेगाव), अस्मा नाझ मोमीन इक्बाल अहमद - बीयुएमएस (मोहम्मदिया युनानी कॉलेज, मालेगाव), सिद्दीकी मोमीना खातून मोहम्मद सलीम - बीयुएमएस (झेड़व्ही़एम़ युनानी कॉलेज, पुणे), लाड श्रीया नारायण - आॅर्गनॉन (गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज, मिरज), शेख सायमा गौर - सर्जरी (गुरु मिस्ट्री होमिओपॅथिक कॉलेज, शेगाव), नेवगे मानसी भाऊ (टी़एऩमेडिकल कॉलेज, मुंबई), टिक्कू साक्षी अवतार (सेठ़जी़एस़मेडिकल कॉलेज,मुंबई), वैष्णवी श्रीवास्तव (इन्स्टिट्यूट आॅफ फिजीकल मेडीसीन महालक्ष्मी, मुंबई), फेस्टी जॉनी - नर्सिंग (आयएनएचएस अश्विनी कोलाबा, मुंबई), शेट्टी मॅक्जिना मायकल - नर्सिंग (साधू वासवानी कॉलेज, पुणे) यांचा समावेश होता़

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ