शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नाशिकला समाजकंटकांनी पेटविल्या दुचाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 16:26 IST

नाशिक : देवळाली कॅम्पमधील जुनी स्टेशनवाडी परिसरातील चौधरी मळ्यातील दोन दुचाकी समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना सोमवारी (दि़२०) रात्रीच्या सुमारास घडली़ या घटनेमध्ये दोन्ही दुचाकींची मोठे नुकसान झाले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी मळ्यात शफीक अब्दुल शेख हे कुटुंबासह राहत असून पेंन्टीगचे काम करून उदरनिर्वाह करतात़ त्यांच्यासोबतच बहीण नूरजहाँ ही पती मोहमद ...

ठळक मुद्देदेवळाली कॅम्पमधील जुनी स्टेशनवाडी परिसरातील चौधरी मळ्यातील घटना दोन दुचाकी पेटवून दिल्या ; देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : देवळाली कॅम्पमधील जुनी स्टेशनवाडी परिसरातील चौधरी मळ्यातील दोन दुचाकी समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना सोमवारी (दि़२०) रात्रीच्या सुमारास घडली़ या घटनेमध्ये दोन्ही दुचाकींची मोठे नुकसान झाले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी मळ्यात शफीक अब्दुल शेख हे कुटुंबासह राहत असून पेंन्टीगचे काम करून उदरनिर्वाह करतात़ त्यांच्यासोबतच बहीण नूरजहाँ ही पती मोहमद इद्रीस शहासोबत राहते़ शेख यांचे दाजी शहा यांनी होंडा कंपनीची नवीन युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५, ईके ५२२०) ही खरेदी केली आहे़ शहा यांना कामानिमित्त उत्तर प्रदेश येथे जावयाचे असल्याने त्यांनी आपली दुचाकी शेख यांचे शेजारी अशोक भालेराव यांच्या घरासमोर व दुचाकीशेजारी उभी केलेली होती़सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेख यांचे मामा रहेमान सय्यद हे दुचाकी पेटलेल्या असल्याने आरडा-ओरड करीत होते़ अज्ञात समाजकंटकांनी शेख यांचे दाजी शहा यांची होंडा युनिकॉर्न (एमएच १५, ईके ५२२०) व शेजारी राहत असलेले अशोक अल्लाटे यांची होंडा शाईन (एमएच १५, एफझेड ३१८२) या दोन्ही दुचाकींना आग लावली होती़ या आगीमध्ये युनिकॉर्नचे ३५ हजार व शाईन दुचाकीचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़या प्रकरणी अज्ञात समाजकंटकांविरूद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़