शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिल सदस्यपदांसाठी बुधवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:32 IST

नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) मतदान होणार आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील ३११ न्यायालयांमध्ये ही मतदानप्रकिया होणार असून, नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार मतदारांसाठी जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात मतदानासाठी तयारी करण्यात आली असून, १४ मतदान केंद्र असणार आहे़ या निवडणुकीसाठी दोन्ही राज्यांतील १६४ वकील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश आहे़

ठळक मुद्दे२५ सदस्यांसाठी निवडणूकजिल्ह्यात ४५०० वकील मतदारजिल्ह्यात १४ मतदान केंद्र

नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) मतदान होणार आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील ३११ न्यायालयांमध्ये ही मतदानप्रकिया होणार असून, नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार मतदारांसाठी जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात मतदानासाठी तयारी करण्यात आली असून, १४ मतदान केंद्र असणार आहे़ या निवडणुकीसाठी दोन्ही राज्यांतील १६४ वकील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश आहे़

महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील एक लाख दहा हजार वकील या निवडणुकीत मतदान करणार असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील वकिलांची संख्या चार हजार पाचशे आहे़ या निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुासर मतदान करावयाचे असून प्रत्येक वकील मतदारास कमीत कमी पाच, तर जास्तीत जास्त २५ मते देण्याचा अधिकार आहे़ या निवडणुकीतून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार असून त्यामधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१० नंतर म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी ही निवडणूक होते आहे़

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदाच्या या निवडणुकीत कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अ‍ॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अ‍ॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ विवेकानंद जगदाळे, अ‍ॅड़ लीलाधर जाधव, अ‍ॅड़ अनिल शालिग्राम हे आठ जण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत़

सदस्यपदासाठीच्या इच्छुकांनी सुमारे वर्षभरापासूनच या प्रचारास सुरुवात केली होती़ महाराष्ट्र तसेच गोवा येथे वकिलांच्या होणाºया विविध परिषद, कार्यक्रम यासाठी इच्छुक आवर्जून हजेरी लावीत होते़ २८ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होऊन उमेदवारांना मतपत्रिकेतील अनुक्रमांकाचे वाटप करण्यात आल्यानंतर प्रचारास खºया अर्थाने सुरुवात झाली़ वकील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच सोशल मीडियाचा (व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक) प्रचारासाठी प्रभावीपणे वापर करण्यात आल्याचे दिसून आले़ सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होणाºया या निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़जिल्हा न्यायालयात ३ हजार ९२ मतदानमहाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या मतदानासाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील नवीन इमारतीतील आयटी लायब्ररी व सहायक सरकारी वकिलांच्या कार्यालय, असे दोन मतदान केंद्र असणार आहे़ जिल्हा न्यायालयात ३ हजार ९२ मतदार मतदान करणार असून २००९ पर्यंत नोंदणी केलेल्यांचे आयटी लायब्ररीमध्ये, तर २०१० ते २०१७ मध्ये नोंदणी केलेले, पुरवणी यादी व कामगार न्यायालयातील वकिलांना सहायक सरकारी वकिलांच्या कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे़ या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना बार कौन्सिल, नाशिक बार कौन्सिलचे ओळखपत्र, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक सोबत ठेवावे लागणार आहे़- दीपक मोरवाल, मतदान केंद्र अध्यक्ष, जिल्हा न्यायालयनाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्रनाशिक जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिकरोड न्यायालय, पिंपळगाव (ब) न्यायालय, चांदवड न्यायालय, दिंडोरी न्यायालय, इगतपुरी न्यायालय, कळवण न्यायालय, मालेगाव न्यायालय, मनमाड न्यायालय, नांदगाव न्यायालय, निफाड न्यायालय, सटाणा न्यायालय, सिन्नर न्यायालय, येवला न्यायालय या ठिकाणी मतदान केंद्र असणार आहे़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयElectionनिवडणूक