शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बेवारस स्फोटके सापडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 14:18 IST

नाशिक : पाथर्डी - गौळाणे रस्त्यावरील मोंढेवस्तीलगत रस्त्याच्याकडेला बेवारस गोणीत जिलेटीनच्या ६० कांड्या व १७ डिटोनेटर्स सापडल्याची घटना सोमवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास घडली़ नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी करून स्फोटकांची गोणी ताब्यात घेतली़ या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा ...

ठळक मुद्दे पाथर्डी - गौळाणे रस्त्यावरील मोंढेवस्तीलगत रस्त्याच्याकडेला बेवारस गोणीजिलेटीनच्या ६० कांड्या व १७ डिटोनेटर्सपोलिसांकडून स्फोटके जप्त ; अफवांना ऊत

नाशिक : पाथर्डी - गौळाणे रस्त्यावरील मोंढेवस्तीलगत रस्त्याच्याकडेला बेवारस गोणीत जिलेटीनच्या ६० कांड्या व १७ डिटोनेटर्स सापडल्याची घटना सोमवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास घडली़ नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी करून स्फोटकांची गोणी ताब्यात घेतली़ या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, परिसरातील डोंगर फोडून खडीक्रेशरसाठी लागणाºया दगडासाठी या स्फोटकांचा वापर केला असल्याची परिसरात चर्चा आहे़इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी - गौळाणे रस्त्यावर असलेल्या मोंढी वस्तीलगत रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका बेवारस स्थितीतील गोणी नागरिकांना आढळून आली़ या गोणीमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलिसांना याबाबत माहिती दिली़ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी बॉम्बशोधक व नाशक पथकास (बीडीडीएस) माहिती दिली़ या पथकाने वस्तुची तपासणी केली असता ६० जिलेटीनच्या कांड्या व १७ डिटोनेटर्स आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत़या प्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय पाळदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरोधात स्फोटक पदार्थ निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़