शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नाशिकमध्ये कचºयात सापडले सोन्याचे दागिने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:19 IST

नाशिक : लक्ष्मीपूजनासाठी गावी जाण्यापूर्वी पत्नीने घरातील पाच लाख रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा डबा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पत्नीने कचºयाच्या डब्याजवळील प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला अन् पतीने कचरा समजून तो इतर कचºयाबरोबरच गोणीत भरून खतप्रकल्पावर नेऊन टाकला़ कचरावेचक महिला व तिच्या मुलीस हा दागिन्यांचा डबा मिळाल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेस ...

ठळक मुद्दे साडेतेरा चौदा तोळे सोन्याचे अन् ३४७ ग्रॅम चांदीचे दागिनेप्रामाणिकपणाबाबत कचरावेचक महिलेस दहा हजार रुपयांचे बक्षिस

नाशिक : लक्ष्मीपूजनासाठी गावी जाण्यापूर्वी पत्नीने घरातील पाच लाख रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा डबा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पत्नीने कचºयाच्या डब्याजवळील प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला अन् पतीने कचरा समजून तो इतर कचºयाबरोबरच गोणीत भरून खतप्रकल्पावर नेऊन टाकला़ कचरावेचक महिला व तिच्या मुलीस हा दागिन्यांचा डबा मिळाल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेस मिळाली अन् त्यांनी संबंधित कुटुंबीयांचा शोध घेत कचरावेचक महिलेच्या हस्ते या कुटुंबीयांचे दागिने शुक्रवारी (दि़३) परतही केले़ दरम्यान, संबंधित कुटुंबाने या प्रामाणिकपणाबाबत महिलेस पोलिसांच्या हस्ते दहा हजार रुपयांची बक्षिसी देऊन सत्कार केला तसेच अजून प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे उद्गारही काढले़पाथर्डी फाटा परिसरातील वासननगरमधील शरद व सरिता दळवी हे दाम्पत्य लक्ष्मीपूजनाला गावी जाण्यासाठी तयारी करीत होते़ सरिता दळवी यांनी घरातील साडेतेरा चौदा तोळे सोन्याचे अन् ३४७ ग्रॅम चांदीचे असे सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले़ सदर पिशवी ही बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घरातील कचºयाच्या डब्याशेजारी ठेवली होती, तर शरद दळवी यांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी घरातील सर्व कचरा एका गोणीत टाकला त्यामध्ये दागिन्यांची प्लॅस्टिकची पिशवीही टाकली़ घंटागाडी उशिरा येणार असल्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी कचºयाची गोणी दुचाकीवरून महापालिकेच्या विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या कोपºयावर नेऊन टाकली़कचरा फेकून परतलेल्या दळवी यांच्या मुलांनी सुरसुरी मागितली असता सरिता यांनी कचºयाच्या डब्याशेजारी असलेल्या दागिन्यांच्या पिशवीत सुरसुरी असल्याचे सांगितले़ कचरा समजून दागिनेही फेकून आल्याचे लक्षात येताच दळवी पुन्हा संंबंधित ठिकाणी गेले, मात्र त्याठिकाणी कचºयाची गोणी नव्हती, कोणीतरी ती खत प्रकल्पात फेकून दिली होती़ त्यामुळे दळवी यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून दागिन्यांबाबत तक्रार केली़ लक्ष्मीपूजनाच्या दुसºया दिवशी खतप्रकल्पात रोजाने काम करणाºया गंगूबाई आसरुबा घोडे (५५, साठेनगर, गरवारेजवळील झोपडपट्टी, अंबड) व तिची मुलगी मुक्ता व सुनीता यांना कचरा वेचत असताना हा प्लॅस्टिकचा डबा व त्यातील सोन्या-चांदीचे दागिने सापडले होते़कचरावेचक घोडे यांना दागिने मिळाल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार डी़ पी़ पाळदे, पोलीस नाईक ए़ ए़ शेख, पोलीस शिपाई डी़ बी़ बर्शिले, एस़ डी़ लांडे यांना मिळाली़ त्यांनी पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना सांगितल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक गावित व बेल्हेकर यांना चौकशीचे आदेश दिले़ या पथकाने गंगूबाई घोडे व मुक्ता घोडे यांची चौकशी केल्यानंतर दागिने सापडले असून, चोर समजतील म्हणून पोलिसांकडे दिले नसल्याचे सांगितले़ पोलिसांनी दिलेले दागिने, पावत्यांवरील मोबाइल क्रमांक व अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार यावरून हे दागिने दळवी कुटुंबाचे असल्याचे समोर आले़ सहायक पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दागिन्यांबाबत खातरजमा केल्यानंतर ते शुक्रवारी (दि़३) दळवी कुटुंबीयांना देण्यात आले़