शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात भटक्या कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात सिडकोतील तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:09 IST

नाशिक : शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांमुळे होणाºया अपघातांमध्ये वाढ झाली असून कुत्रे आडवे गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या रिक्षा अपघातात एका तीस वर्षीय तरुणास जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि़२८) सिडकोत घडली़ श्याम बलदेव गवई (रा़३०, रायगड चौक, पवननगर सिडको) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ...

नाशिक : शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांमुळे होणाºया अपघातांमध्ये वाढ झाली असून कुत्रे आडवे गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या रिक्षा अपघातात एका तीस वर्षीय तरुणास जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि़२८) सिडकोत घडली़ श्याम बलदेव गवई (रा़३०, रायगड चौक, पवननगर सिडको) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्याम गवई हा मंगळवारी सिडको परिसरातून रिक्षाने प्रवास करीत होता़ या रिक्षाला अचानक भटके कुत्रे आडवे गेल्याने रिक्षाचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व रिक्षा उलटली़ या अपघातात गवई याचे डोके व शरीराला जबर मार लागल्याने त्यास तत्काळ आडगावच्या डॉ़वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ अपघातात प्रकृती गंभीर झालेल्या गवईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाला़वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़संजय मानकर यांनी या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यास कळविली़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, अपघातास निमंत्रण ठरणाºया या भटक्या कुत्र्यांचा लवकराव लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़भटक्या कुत्र्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ

नाशिक शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून महापालिकेकडून केली जाणारी नसबंदी ही केवळ फार्स ठरते आहे़ कुत्र्यांच्या वाढत्या संख्येस आळा घालण्यासाठी लाखो रुपयांचा ठेका दिला जात असून ठेकेदार नेमका करतो काय असा प्रश्न नागरिक विचारता आहेत़ दरम्यान, रात्रीच्या वेळी झुंडीच्या झुंडीने बसलेले भटके कुत्रे हे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पाठिमागे धावत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळते आहे़