शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यातील विळवंडीतील महिलेच्या खूनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 17:09 IST

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील शेतात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे़ अनैतिक संबंधातून मंदाबाई रानु लिलके (४१, राक़ोचरगाव) या महिलेचा प्रियकर संशयित कृष्णा केरू लिलके (२५, रा. कोचरगाव, ता.दिंडोरी) यानेच हा खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे़

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील घटनामहिलेचे अनैतिक संबंध प्रियकरानेच खून केल्याचे उघड

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील शेतात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे़ अनैतिक संबंधातून मंदाबाई रानु लिलके (४१, राक़ोचरगाव) या महिलेचा प्रियकर संशयित कृष्णा केरू लिलके (२५, रा. कोचरगाव, ता.दिंडोरी) यानेच हा खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे़विळवंडी शिवारातील पुंडलीक वाघेरे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली १२ नोव्हेंबरला एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता़ तोंडावर व कपाळावर वार तसेच मृतदेह कुजलेला यामुळे प्रारंभी या महिलेची ओळख पटत नसल्याने दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन करणाºया वैद्यकिय अधिकाºयांनी घातक हत्याराने वार केल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्याने महिलेचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते़पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी खुनाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़ महिलेचे वर्णनावरून ती कोचरगाव येथील मंदाबाई रानु लिलके (४१) असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ ७ आक्टोबर रोजी मंदाबाई ही कोचरगाव येथुन विळवंडी येथे बाजरी विकण्यासाठी गेली होती़ पोलिसांनी सखोल माहिती घेत कोचरगाव येथील कृष्णा केरू लिलके यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मंदाबाईच्या खुनाची कबुली दिली. मयत मंदाबाईसोबत ५ वषार्पासुन प्रेम संबंध असलेला कृष्णा लिलके हा दोन महिन्यांपासून शेतीच्या कामासाठी चांदवड तालुक्यात कुटूंबियांसोबत गेला होता़दरम्यान, मंदाबाईचे इतर लोकांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यास मिळाल्याने त्या दोघांमध्ये वाद झाले होते़ कृष्णा लिलके हा ७ आॅक्टोबरला कोचरगाव आला व त्याच रात्री विळवंडी येथे मंदाबाईस भेटला होता. या ठिकाणी रात्री ते दोघे कोचरगाव येथे रस्त्याने जात असतांना दोघांमध्ये पुन्हा वाद झाले व रागाच्या भरात कृष्णा याने आंब्याचे झाडाखाली असलेला लाकडी दांडा व दगड मंदाबाईच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची कबुली कृष्णा लिलके याने पोलिसांना दिली आहे़स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, मच्छिंद्र रणमाळे, रामभाऊ मुंढे, पोलीस हवा दिपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राऊत, हनुमंत महाले, सुधाकर खरोले, गणेश वराडे, वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, पोलीस शिपाई प्रदिप बहिरम, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, संदिप लगड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.